सध्या हिंदुत्वाची अफूची गोळी दिली जात असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी हिंदुत्वावरुन हल्लाबोल केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचा 24 वा वर्धापन दिन सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी अमोल कोल्हे आपल्या भाषणात बोलत होते. कोल्हेंनी भाषणात सत्ताधारी भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन चांगलंच धारेवर धरलं आहे.
लाईफ स्टोरी, शैक्षणिक अनुभव अन् मिळालेलं यश, दर्शनाने शेवटच्या भाषणात सांगितलं होतं…
खासदार कोल्हे म्हणाले, सध्या देशात आणि राज्यात एक नवीन गोळी आली आहे. मागील आठ ते नऊ वर्षांपासून ही गोळी दिली जात आहे. कार्ल्स मार्क्सने सांगितलं होतं धर्म ही अफूची गोळी असते. हीच हिंदुत्वाची गोळी सध्या दिली दिली जात असल्याचं ते म्हणाले आहेत.
जर तुमच्याकडे हिंदुत्वाच्या अफूची गोळी घेऊन कोणी आलं तर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आरसा दाखवावा, असं आवाहन अमोल कोल्हे यांनी जनतेला केलं आहे. तसेच नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावरुनही त्यांनी मोदी सरकारला घेरलं आहे.
भारतात विश्वचषक खेळण्यासाठी पाकिस्तानची आणखी एक मागणी, भारत करणार का मान्य?
छत्रपती शिवरायांनी राजदंड हा धर्मगुरुंच्या नाहीतर स्वत:च्या हाती ठेवला कारण राजसत्ता आणि धर्मसत्ता एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लोककल्याणाचं काम करतील पण आता नव्या संसदेच्या उद्घाटनादरम्यान राजदंड पाहिला त्यावेळी एक प्रश्न पडला की लोककल्याणाचा विचार आता कोण करतंय? असा सवाल उपस्थित झाल्याचं ते म्हणाले आहेत.
राष्ट्रवादीनेही केला सर्व्हे, आमचाच पक्ष मोठा होणार असल्याचा जयंतरावांचा दावा…
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू इथल्या समाधीचा जीर्णोद्धार करण्याचं काम केलं. जे की आत्तापर्यंतच्या एकाही नेत्याने हे काम हाती घेतलेलं नव्हतं, असंही ते म्हणाले आहेत.
तसेच मावळ्यांशिवाय महाराज नसतात आणि त्याशिवाय स्वराज्य उभा राहात नाही तर त्याप्रमाणे राष्ट्रवादीची धुरा खांद्यावर घेऊन गेलं अव्याहतपणे पाव शतक वाटचाल करणारे आपण सर्वजण, खरंतर येण्यास थोडा उशीर झाला, आपल्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजीया खान यांनी सांगितलेल्या चहाचा आस्वाद घेत होतो, नाही आजकाल चहा थोडा वेगळा का बनतो असं म्हणतात, मग त्याच्यामध्ये त्यांना विचारलं की, धनुभाऊ या चहाला एवढा वेळ का लागतो? त्यावर त्यांनी सांगितलं की, त्याच्यात त्यांनी सांगितलं की, त्याच्यात प्रसिद्धीचं दूध असतो, उद्योजकांची चहापत्ती असते, त्याच्यामध्ये आर्थिक सगळी साखर टाकली जाते आणि त्याच्यानंतर हा चहा बनतो, त्याच्यामुळे आजकाल चहाला थोडा वेळ लागतो असा टोलाही यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी लगावला.