सैन्यात भरती व्हायचंय! महाज्योती संस्थेकडून उमेदवारांना प्रशिक्षणासह विद्यावेतनही मिळणार
Mahajyoti Military Pre-Conscript Training : सैन्यात जाण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र, आर्थिक क्षमता नसल्यामुळे बरीच मुलं सैनिक शाळेत (Military school) प्रवेश घेऊन सैनिकी शिक्षण घेऊ शकत नाही. सैनिकी शिक्षण नसल्यामुळं फारच कमी मुलांना सैन्यात प्रवेश मिळवणं सोप जातं आणि त्यांचा सैन्यात टिकाव लागतो. दरम्यान, विद्यार्थ्यांना सैन्यात जाता यावं, यासाठी शासनस्तरावर अनेक प्रयत्न केले जातात. त्याचाच भाग म्हणून मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण (Military Pre-Conscript Training) दिल्या जाते. मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता इतर मागासवर्ग, विमुक्त जाती. भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्याथ्यांना 2023-24 या वर्षांमध्ये मिलिटरी भरतीच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योती (Mahajyoti) मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरीता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. (Free Military Recruitment Exam Pre-Training from Mahajyoti Institute, Tuition Fee Rs 10 thousand, Total Seats 1500)
प्रशिक्षणासाठी एकुण मंजूर विद्यार्थी संख्या – 1500
प्रशिक्षणाचा कालावधी – 6 महिने
विद्यावेतन – 10,000/- प्रतिमाह (75% उपस्थिती असल्यास)
आकस्मिक निधी– 12,000/- (एकवेळ
योजनेच्या लाभासाठी पात्रता :
1. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी.
2. विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/ असावी.
3. विद्यार्थी नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/ असावी.
4. विद्यार्थी 12 वी वर्गात प्रवेश घेतलेला असावा किंवा 12 वी वर्ग उत्तीर्ण केलेला असावा.
वयोमर्यादा –
विद्यार्थ्याचे किमान वय 17 वर्ष व कमाल वय 21 वर्ष पेक्षा जास्त असू नये.
वैद्यकीय अर्हता :-
उंची – कमीत कमी 157 से.मी (पुरुष)
कमीत कमी 152 से.मी (महिला)
छाती – कमीत कमी 77 से. मी. (दीर्घ श्वास घेतल्यानंतर 82 से.मी) केवळ पुरुषांकरिता
महाज्योतीच्या कोणत्याही योजनांचा कोणत्याही स्वरुपात लाभ घेतलेल्या विद्यार्थ्याने चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करु नये, त्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
आवश्यक कागदपत्रे –
आधार कार्ड
जात प्रमाणपत्र
निवास प्रमाणपत्र
नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र
पासबुक किंवा रद्द केलेला चेक
अनाथ असल्यास प्रमाणपत्र.
निवड –
– महाज्याोती मार्फत विद्यार्त्यांची निवड करण्यासाठी महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. विद्याथ्यांची अंतिम निवड छाननी परिक्षेद्वारे करण्यात येईल. छाननी मध्ये पात्र विद्यार्थ्यांची Militarty bharati पूर्व परिक्षेच्या धर्तीवर अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येईल.
– चाळणी परिक्षेत प्राप्त गुणांकानुसार मेरीटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची यादी व प्रतीक्षा यादी संकेतस्थळार प्रसिध्द होईल.
शिक्षणाकरिता द्यावयाचे अनिवार्य वैद्यकीय मानके :-
– उमेदवाराचे शरीर मजबूत आणि चांगले मानसिक आरोग्य असावे.
– छातीचा विकास कमीत कमी 5 से.मी विस्तारित असावा.
– प्रत्येक कानाने सामान्य ऐकणे आणि दोन्ही डोळ्यांमध्ये चांगली दुरबीन दृष्टि असणे आवश्यक आहे. त्याला प्रत्येक डोळ्याने 6/6 अंतराचा दृष्टिकोन वाचता आला पाहिजे
अर्ज करताना काही अडचण आल्यास कृपया महाज्योतीशी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा –
फोन – 0712-2870120/21
ई-मेल आयडी – mahajyotimpsc21@gmail.com