MP Nilesh Lanke Reaction After Wife Rani Lanke Defeat : अहिल्यानगर जिल्ह्यात पारनेर मतदारसंघातून खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या पत्नी राणी लंके यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झालाय. त्यानंतर निलेश लंके म्हणाले आहेत की, विधानसभा निवडणूकीत काठावर पराभव झाला, हा निश्चितच चिंतनाचा भागा आहे. तुम्ही आत्मचिंतन (Rani Lanke Defeat) करा. आजचा आणि येणारा काळही आपलाच आहे. निलेश लंके हा उगवता सुर्य आहे, तो खचत नाही. चुक झाली ती झाली. आता आरोग्य शिबिराचे आयोजन करून पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरूवात करू या. आपण आपल्या कामाच्या जोरावर राज्यात (Maharashtra Politics) ओळख निर्माण केली आहे. विधानसभेत पराभव झाला म्हणून आपले राजकारण संपलेले नाही. चुकांच्या दुरूस्त्या करा. समाजाला दोष देऊ नका, असा सल्ला खासदार निलेश लंके यांनी दिलाय.
लोकसभा निवडणूकीत पराभव केला म्हणून माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी ईव्हिएम मशिनच्या माध्यमातून माझ्याविरोधात ट्रॅप लावल्याचा आरोप विद्यमान खासदार नीलेश लंके यांनी केला. दरम्यान, महिनाभरात गुड न्युज देतो (Vidhan Sabha Election 2024) असे सांगत खा. लंके यांनी आगामी राजकारणातील सस्पेन्स कायम ठेवला. लोकसभा निवडणूकीतील धक्कादायक पराभवानंतर खा. नीलेश लंके समर्थकांचा सुप्यात मेळावा पार पडला. या मेळाव्यात खा. लंके यांनी आक्रमकपणे भूमिका मांडत विरोधकांवर शरसंधान सोडतानाच समर्थकांचेही कान टोचले.
दिल्लीतील महायुतीच्या बैठकीची इनसाईड स्टोरी काय? अमित शाहांनी मागवलं रिपोर्ट कार्ड
यावेळी बोलताना खा. लंके म्हणाले, या निवडणूकीत यांत्रिकीरणाने घात केला आहे. कोणी काही म्हणत असेल तर मी आमदार नाही तर आज जिल्ह्याचा खासदार आहे. प्रस्थापित आणि घराणेशाही विरोधात माझा उदय झाला आहे. त्यामुळे संघर्ष मला नवा नाही. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, असे सांगत समर्थकांचे कान टोचताना विधानसभा निवडणूकीत सतर्क राहिले असते तर आपल्या वाट्याला हा पराभव आला नसता. एकमेकांमधील जिरवाजिरवीचे राजकारण आता बंद करा, असा सल्लाही खासदार लंके यांनी दिला.
राज्यात फडणवीसांच्या जागी वेगळं कुणी आणलं जातंय का? संजय राऊतांनी सांगितला आतला डाव
यावेळी माधवराव लामखडे, बाळासाहेब हराळ, माणिकराव भोसले, खंडू भुकन, बाबासाहेब तरटे, दिपक लंके, योगिराज गाडे, सुदाम पवार, अजय लामखडे, राजेंद्र चौधरी, शिवाजी व्यवहारे, नितीन अडसूळ, मारूती रेपाळे, डॉ. बाळासाहेब कावरे, ॲड. राहूल झावरे, भाऊसाहेब काळे, राजेंद्र शिंदे, गंगाराम बेलकर, दादा शिंदे, भागुजीदादा झावरे, शिवाजी जाधव, विश्वास जाधव, उत्तम साळुंके, सुवर्णा धाडगे, वसंत ठोकळ, सतीश पालवे, किसन सुपेकर, शकुंतला लंके, ऐश्वर्या ढोरजकर, वंदना गंधाक्ते, डॉ. विद्या कावरे, राजेश्वरी कोठावळे, वंदाना ठुबे, सायली चेडे, अशोक घुले, ठकराम लंके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की, निवडणूक ही बंदूकीची गोळी असते. एकदा सुटली की सुटली. राजकारणात आज जाती धर्माचा रंग दिला जात असून एक दिवस भारताचा श्रीलंका झाल्याशिवाय राहणार नाही. देश एकसंघ राहण्यासाठी जाती-पातींचे राजकारण योग्य नसल्याचे लंके म्हणाले.