Sanjay Dina Patil On Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पोलिस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहुन खासदार संजय दिना पाटील(Sanjay Dina Patil) यांच्यावर कारवाईची मागणी केलीयं. संजय राऊत यांच्या लेटरबॉम्बला खासदार संजय दिना पाटील यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. मी चुकीचं केलं असेल तर पोलिस कारवाई करतील, मी चौकशीला तयार असल्याचं संजय दिना पाटलांनी स्पष्ट केलंय.
Ketan Agrawal Murder : होयं, मला चेतन हवा होता, पण केतनला मी..,; सियाने सगळेचं पत्ते उघडले!
पुढे बोलताना संजय दिना पाटील म्हणाले, मी खुलेआम बोललो आहे ना, कारवाई होऊ दे ना. मी जर काही चूक केलं असेल तर पोलीस कारवाई करतील, मी चौकशीला तयार आहे. माझं शिवसैनिकांसोबत काहीही घेणं देणं नाही, मी हे पहिल्यापासून बोलतोयं. शिवसैनिकांचे माझ्यावर उपकार आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या लोकांचे माझ्यावर उपकार आहेत की त्यांनी मला निवडून दिलं. एकदा नाही 3 वेळा निवडून दिलं, आमदार बनवलं, 2 वेळा खासदार बनवलं. माझं त्यांच्याशी काही वाकडं नसल्याचं संजय पाटील म्हणाले आहेत.
तसेच मी कशावर रिॲक्शन दिली जेव्हा ते म्हणाले, तुम्ही काही केलं तर आम्ही पाहून घेऊ. मी कशाला काय करू, मला काय पडलंय ? जेव्हा ते काही करतील तर आमची तयारी असेल, ते आले तर आम्ही काय मार खायचा ? असा सवाल त्यांनी विचारला. मला काही सेक्युरिटीची गरज नाहीये, त्यांना सेक्युरिटीची गरज आहे. ते मोठ लोक आहेत, मी पहिल्यापासून त्यांना मानसन्मान खूप दिला असल्याचंही पाटील म्हणाले आहेत.
जळगावला स्वतंत्र जिल्हा रेशीम कार्यालय मंजूर; वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारेंच्या प्रयत्नांना यश!
दरम्यान, संजय दिना पाटील यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांवर टीका केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी UAPA कायद्यांतर्गत कारवाईसाठी थेट पोलिस आयुक्त भारती देवेन यांना पत्र लिहिलं. संजय पाटील यांनी 5 लोकांना ठार केल्याची कबूली दिली असून त्यांच्यावर तत्काळ हत्येचा गुन्हा दाखल करावा. लोकप्रतिनिधीकडून बॉम्ब टाकण्याची धमकी दिली जाणे हा राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर मुद्दा आहे. त्यांनी घरात बॉम्ब बनवले का? याचा तपास करण्यासाठी एटीएसमार्कफ त्यांची चौकशी करावी, अशी मागणी राऊत यांनी केली.
