Download App

खासदार Sanjay Jadhav भडकले : ‘मी दोन बापाची अवलाद नाही’

केंद्रीय निवडणूक आयोगाने ( Election Commission )  काल शिवसेना ( Shivsena )  व धनुष्यबाण कुणाचा हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Ekanath Shinde )  यांच्या बाजूने दिला. त्यामुळे आता अधिकृतपणे शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदेंकडे गेला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर अनके जणांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी देखील  निवडणूक आयोगाच्या निर्णयावर टीका केली आहे. शिवसेना पक्ष हा शिंदेंना मिळाला नसून भाजपने त्यांना दिला आहे, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

शिवसेना पक्ष कुणाचा यासाठी आमदार व खासदार यांच्याकडून आयोगाने शपथपत्र मागावले होते. यात बंडू जाधव यांनी शिंदे गटाच्या बाजूने शपथपत्र दिल्याची चर्चा आहे. यावर बंडू जाधव यांनी उत्तर दिले आहे. माझे नाव संजय हरिभाऊ जाधव आहे. मी हरिभाऊ जाधव यांच्या मुलगा आहे, मी दोन बापाची अवलाद नाही, असे म्हणत त्यांनी शिंदे गटाच्या बाजूने शपथपत्र दिल्याचा आरोपांवर उत्तर दिले आहे. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत होतो, आहे आणि शेवटपर्यंत त्यांच्याच सोबत राहणार आहे, असे जाधव यांनी सांगितले.

दरम्यान या देशात सध्या न्याय राहिला आहे. सत्ता कोणाची बांधील नाही आहे. आज तुम्ही पंतप्रधान असाल पण उद्या नसणार आहात. त्यामुळे सत्तेचा माज दाखून नका, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. तसेच  निवडणूक आयोग हा केंद्र सरकारच्या इशाऱ्याने चालतो आहे, असे म्हणत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज