Maharashtra politics : आदित्य ठाकरेंकडून फोटो ट्विट, निष्ठावंत म्हणाले…
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Eletion Commission) शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला. उद्धव ठाकरे गटाला धक्का देत निवडणूक आयोगाने शिवसेना चिन्ह व पक्षावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा हक्क असल्याचा निर्णय दिला.
या निकलानंतर आदित्य ठाकरेंकडून त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोवर ठाकरे गटाला पाठिंबा देणाऱ्या लोकांनी पाठिंबा देणाऱ्या कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काहींनी म्हटलं आहे. की, ‘साहेब आम्ही सदैव एकनिष्ठ तुमच्या सोबत मातोश्री सोबत.’
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 17, 2023
दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाला धक्का देत निवडणूक आयोगाने शिवसेना चिन्ह व पक्षावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा हक्क असल्याचा निर्णय दिला. या निकलानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटरचा प्रोफाईल फोटो बदलला आहे. आता त्यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हा ट्विटरचा प्रोफाईल फोटो ठेवला आहे.
Raju Shetti : रावणाने धनुष्य उचललं, पण मतदार श्रीरामाच्या रूपात येतील…
त्याच बरोबर केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर एक ट्विट देखील केले आहे. यामध्ये ते म्हणाले की, ‘निवडणूक आयोगाने दिलेला आजचा निकाल आम्ही नम्रपणे स्वीकारतो. वंदनीय #हिंदुहृदयसम्राट #बाळासाहेब_ठाकरे यांचे आम्ही सगळे मावळे आहोत.त्यांच्या विचारांशी प्रतारणा होत असेल तर ती आम्ही पहात राहू शकत नाही. #शिवसेना आता योग्य मार्गावर वाटचाल करेल असे वचन आम्ही सर्व मावळे तमाम जनतेला देतो.’ असं ट्विट देखील त्यांनी केलं आहे.