Download App

‘DNA किट्स नाहीत ही आरोपींनी मदत करण्याची योजनाच’; राऊतांची फडणवीसांना थेट पत्रच

Sanjay Raut News : फॉरेन्सिक लॅबमध्ये DNA किट्स उपलब्ध नाहीत, ही हाय प्रोफाईल आरोपींना मदत करण्याचीच योजना असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. या मुद्द्यावरुन राऊतांनी गृहविभागावरही ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी संजय राऊत यांनी केली आहे. दरम्यान, यासंदर्भात संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांना लेखी पत्राद्वारे तक्रार केली आहे.

संजय राऊत पत्रात म्हटले, “एका गंभीर विषयाकडे आपले लक्ष वेधित आहे. न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय ही महाराष्ट्र राज्याच्या गृहविभागाच्या अखत्यारीत असलेली संस्था न्यायदानाच्या प्रक्रियेत एक महत्त्वाची भूमिका बजावत असते. या प्रयोगशाळेतील DNA चा अहवाल हा विवादित पितृत्व चाचणी, खून, बलात्कार, POCSO कायदा इत्यादींमध्ये महत्त्वाचा पुरावा म्हणून न्यायालयात ग्राह्य धरला जातो, परंतु एप्रिल २०२३ पासून DNA साठी लागणारे किट्स बहुतेक सर्व प्रयोगशाळेत उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्या विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे, अशी माझी माहिती आहे.

Horoscope Today: ‘कन्या’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…

काही गंभीर तसेच संवेदनशील गुन्ह्यांतील हायप्रोफाईल आरोपींना अप्रत्यक्ष मदत व्हावी म्हणून हा तुटवडा निर्माण करणे व त्यातून पुरावे नष्ट करण्याची ही योजना असल्याचे बोलले जाते, ही अत्यंत गंभीर बाब आहे. परिणामी अनेक गुन्ह्यांच्या तपासामध्ये विलंब होत आहे. तपासामध्ये जप्त केलेला मुद्देमाल खराब होऊन त्यांचा गुन्हा सिध्दतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

सुनील केदार यांचा मुक्काम कोठडीतच; जामीन अन् शिक्षेला स्थगिती न्यायालयाने नाकारली

या संचालनालयाला पूर्ण वेळ महासंचालक, न्यायिक व तांत्रिक तसेच संचालक असूनदेखील या गंभीर विषयाकडे लक्ष नसल्याचे दिसून येते. तरी कृपया या तक्रारीची दखल घेऊन यामध्ये दोषी असणारे अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी,” अशी मागणी संजय राऊतांनी पत्राद्वारे केली आहे.

दरम्यान, टेस्टसाठी लागणारे किट्स फॉरेन्सिक लॅबमध्ये उपलब्ध नाहीत, ही हाय प्रोफाईल आरोपींना मदत करण्याचीच योजना असल्याची चर्चा आहे. डीएनए टेस्टसाठी तुटवडा निर्माण करुन पुरावे नष्ट करण्याची योजना असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. अद्याप या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. फडणवीस या मुद्द्यावरुन काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us