‘संजय राऊतांची अवस्था पोपटासारखी’.. अजितदादा गटाच्या आमदाराचा पलटवार

‘संजय राऊतांची अवस्था पोपटासारखी’.. अजितदादा गटाच्या आमदाराचा पलटवार

Amol Mitkari replies Sanjay Raut : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वातील शेतकरी आक्रोश मोर्चाची काल सांगता झाली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घणाघाती टीका केली. त्यांच्या या टीकेवर पलटवार करत संजय राऊतांची अवस्था पोपटासारखी झाली असा घणाघात अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला. मिटकरी यांनी संजय राऊतांबरोबरच खासदार अमोल कोल्हे यांच्यावरही जोरदार टीका केली.

‘अजित पवारांशी बरोबरी करू नका, बारामतीची लोकं हुशार’ मिटकरींचा अमोल कोल्हेंना इशारा

महाविकास आघाडीच्या आक्रोश मोर्चात खासदार संजय राऊत यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांनी भाषणाला सुरुवात करताना गळ्यातील पंचा फिरवला. आमच्या पाडापाडीत पडाल तर पहिले तुम्ही पडाल. इकडे येऊन पाहा, हवा बहुत तेज चल रही है अजितराव, टोपी उड जायेगी, असे संजय राऊत म्हणाले. अमोल कोल्हे यांनी आपल्या नेत्यांबरोबर, पक्षाबरोबर इमान राखले. ते बेईमान झाले नाहीत म्हणून त्यांना पाडणार का? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. मात्र महाराष्ट्र इमानदारासोबत आहेत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर केला होता.

त्यांच्या याच टिकेवर मिटकरींनी प्रत्युत्तर दिलं. मिटकरी म्हणाले, संजय राऊत यांची अवस्था पोपटासारखी झाली आहे. दोघेही खासदार पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. ते अजित पवार यांच्यामुळे, कोल्हेंनी आपला पक्ष का सोडला हा प्रश्न स्वतःला विचारा ते आमच्या पक्षात आले त्यानंतर शिरुरमधून खासदार झाले. आता ज्या काही तुमच्या शाळा भरवल्या जात आहेत त्यावर महाराष्ट्राची जनता लक्ष ठेऊन आहे. तुम्ही सर्वांचा नाद करा पण, अजितदादांचा करू नका, असा इशाराही मिटकरी यांनी दिला.

जरांगे पाटलांचं आरक्षण राजकीय दिशेने भरकटतंय, अमोल मिटकरी स्पष्टच बोलले

follow us
  • fb
  • instagram
  • youtube