‘जरांगे पाटलांचं आरक्षण राजकीय दिशेने भरकटतंय’, अमोल मिटकरी स्पष्टच बोलले
Amol Mitkari On Manoj Jarange : गेल्या काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जरांगेंना चांगलचं फटकारले होतं. जरांगे-पाटलांचं आरक्षणावरील लक्ष्य विचलित होत असल्याची टीका त्यांनी केली होती. त्यानंतर आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीही जरांगेंवर टीका केली. जरांगेंचं आंदोलन राजकीय दिशेनं भरकटतांना दिसतंय, असा वक्तव्य त्यांनी केलं.
Pune News : धक्कादायक ! दुबईत वाढदिवस का साजरा केला नाही ? भांडणामुळे पतीचा गेला जीव
जरांगे आणि भुजबळ यांच्यात शाब्दित फैरी झडत आहेत. कालपर्यंत जो संघर्ष वैचारिक होता, तो आता वैयक्तिक उणीदुणी काढण्यापर्यंत गेला. हीच बाब अधोरेखित करून अमोल मिटकरी म्हणाले की, जरांगेच्या अलीकडच्या टीका पाहिल्या तर लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली काम करावं लागतंय, भुजबळ तुला जागा दाखवू, अशा आहेत. त्यांनी भुजबळांचा एकेरी उल्लेख करू नये. ते वयाने ज्येष्ठ आहेत. त्यामुळे भुजळांवर टीका करतांना तोल जाऊ देऊ नका. तुम्ही आरक्षणाचे नेतृत्व करत असाल तर त्याबाबत विधान करा. तुम्ही राजकीय वक्तव्ये करू नका. सरकार तुमच्या समस्या सोडवण्यास सक्षम आहे. अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक निर्णय देणार आहे. मात्र भुजबळ यांनी त्यांच्या भाषणात प्रकाश सोळुंखे व अन्य नेत्यांची घर जाळल्यासंदर्भात भाष्य केलं. त्यावरून जरांगे पाटील त्यांच्यावर जी टीका करतात, ते नक्कीच अशोभनीय आहे.
मिटकरी म्हणाले, मनोज जरांगेंची पूर्वीची भूमिका आणि आत्ताची भूमिका बदल्यासारकी वाटते. मराठा समाजाची आधीची मागणी कुणाच्यचाही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या, अशी होती. त्यानंतर सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी झाली. त्यानंतर ओबीसी नेत्यांनी या मागणीला विरोध केला. मात्र, सरकार तरीही कुणबी नोंदी शोधण्याचं काम करत आहे. असं असतांनाही जरांगे ओबीसी नेत्यांवर टीका करत आहे. वैयक्तिक टीका केला जातेय. त्यामुळं जरांगे पाटील यांचे आंदोलन भरकटतंय, आरक्षणारचा फोकस हलला असं म्हणण्यास वाव आहे. त्यामुळं जरांगेंनी भाषा योग्य वापरावी, अशी माझी त्यांना विनंती आहे.
अंधारेंकडूनही जरांगेवर टीका
सध्या मनोज जरांगेंचा राज्यव्यापी दौरा सुरू आहे. ठिकठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात आहे. तर काही ठिकाणी 100 जेसीबीमधून फुले व गुलालही उधळला गेला. यावरूनच सुषमा अंधारे यांनी मनोज जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केला होता. अंधारे म्हणाल्या की, एकीकडे मागास असल्याचं सांगायच तर दुसरीकडे आडनावापुढं पाटील लावायचं… आमच्याकडे काहीच नाही म्हणायचं अन् 100 JCB तून फुलांची उधळण करायची, अशी टीका अंधारेंनी केली