Pune News : धक्कादायक ! दुबईत वाढदिवस का साजरा केला नाही ? भांडणामुळे पतीचा गेला जीव
पुणेः संसारात पती-पत्नीचे वाद होतात. त्यात अनेकदा पतीकडून पत्नीला मारहाण करण्याची घटना घडते. परंतु पुण्यात एक वेगळीच घटना घडली आहे. पत्नीने केलेल्या मारहाणीत बांधकाम व्यावसायिकाला (Construction Business) आपल्या जीवाला मुकावे लागलेय. पुण्यातील (Pune) वानवडी भागात शुक्रवारी दुपारी ही घटना घडली आहे. या प्रकरणी पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातून मृत्यूचे कारणही समोर आले आहे.
NCP Crisis : एका रात्रीत नवरा-बायकोलाही… राष्ट्रवादीच्या पक्ष अन् चिन्हावरील सुनावणीबाबत आव्हाडांचं मोठं वक्तव्य
निखिल पुष्पराज खन्ना (Nikhil Khanna) (वय 36) असे बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. तर पत्नी रेणुका खन्ना (वय 38) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिच्याकडे याबाबत सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलिस तपासात काही प्राथमिक समोर आली आहे. रेणुका हिचा वाढदिवस होता. दुबईत वाढदिवस का साजरा केला नाही. वाढदिवसाला मनासारखे गिफ्ट का दिले नाही ? या कारणातून दोघांमध्ये जोरदार वाद झाले होते. गेल्या काही दिवसांपासून दोघेही एकमेंकाने भांडत होते. शुक्रवारी दुपारीही या दोघांमध्ये याच कारणावरून भांडणे सुरू झाली. एकमेकात मारहाण सुरू झाली.
Ahmednagar Crime : एजंट्सची अरेरावी वाढली, सही केली नाही म्हणून आरटीओ कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला…
रागाच्या भरात पत्नी रेणुका हिने पती निखिल याच्या तोंडावर ठोसा मारला. त्यात निखिल खन्ना हे बेशुद्ध पडले. त्यानंतर भानावर आलेल्या रेणुका यांनी सासऱ्यांना फोन करून घरी बोलवून घेतले आहे. डॉक्टर असलेल्या निखिल यांच्या वडिलांनी त्याला तपासून सीपीआर दिला. त्यानंतर जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु डॉक्टरांनी निखिल याला मृत घोषित केले आहे. ही घटना समजल्यानंतर वानवडी पोलिसांनी रेणुकाला हिला चौकशी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.