Pune News: दुर्दैवी ! सळई डोक्यात पडल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू…

Pune News: दुर्दैवी ! सळई डोक्यात पडल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू…

Pune Accident News: पुण्यातील बाणेर भागात इमारतीचे बांधकाम सुरू असताना लोखंडी सळई डोक्यात पडून पादचारी शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. (Pune Crime news) रुद्र केतन राऊत (वय 9) असे मृत्यू झालेल्या (Pune news) शाळकरी मुलाचे नाव असून या प्रकरणी बांधकाम व्यवसायिकासह अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बाणेर येथे गणराज चौकाजवळ केतन वीरा बिल्डरचे बांधकाम सुरू आहे. काल दुपारी काम सुरू असताना इमारतीवरून सळई मुख्य रस्त्यावर पडली. मात्र ती सळई शाळेतून घरी जाणाऱ्या रुद्रच्या डोक्यात पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

याबाबत रुद्रची आई पूजा केतन राऊत यांनी पुण्यातील चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार गृहप्रकल्पाचे संचालक बांधकाम व्यावसायिक आणि अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करण जोहर करणार मराठी चित्रपट ‘झिम्मा’चा हिंदी रिमेक? दिग्दर्शक हेमंत ढोमेनं थेटच सांगितलं…

यानंतर पोलिसांनी बांधकांम सुरू असलेल्या इमारतीची पाहणी केली. तेव्हा तेथे सुरक्षाविषयक उपाययोजना केल्या नसल्याचे आढळले. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या परिसरात जाळी बसविण्यात आली नव्हती. सुरक्षाविषयक उपाययोजना न करता दुर्घटनेस जबाबदार ठरलेल्या बांधकाम व्यवसायिकासह अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube