NCP Crisis : एका रात्रीत नवरा-बायकोलाही… राष्ट्रवादीच्या पक्ष अन् चिन्हावरील सुनावणीबाबत आव्हाडांचं मोठं वक्तव्य
NCP Crisis : राष्ट्रवादीतील तिढा आता (NCP Crisis) निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कोर्टात पोहोचला आहे. अजित पवार गटाने बाहेर पडल्यानंतर पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा ठोकला. आता हा वाद निवडणूक आयोगासमोर असून सुनावणी सुरू आहे. आता आज निवडणूक आयोगात महत्वाची सुनावणी पार पडली आहे. त्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
सुनावणीबाबत आव्हाडांचं मोठं वक्तव्य…
राष्ट्रवादीच्या पक्ष अन् चिन्हावरील सुनावणी सुरू असताना जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, निवडणूक आयोगासमोर वादविवाद सुरू आहे. यावेळी कायदेशीर बाजू मांडत असताना त्यांनी ब्रह्मानंद रेड्डी विरुद्ध इंदिरा गांधी यांच्या 1978 च्या केसचा दाखला दिला. त्यामध्ये त्यांनी वाद हा एका दिवसामध्ये घडत नसतो. तो अनेक बैठका संवाद यामधून होत असतो. तो अचानक एका रात्रीतून समोर येत नसतो. त्यामुळे शरद पवारांना पक्षाचे अध्यक्ष करण्याचे निवडणूक असो किंवा पक्षातून बाहेर पडण्याच्या महिनाभर आधीपासून अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांना पाठिंबा देत होते.
सुप्रिया सुळेंचा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न; दादा, दादा करत आयुष्य गेलं, मग….; तटकरेंचा घणाघात
त्यावेळी निवडणूक आयोगाला पाठवण्यात येणाऱ्या पत्रांमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी पक्षातील कार्यपद्धतीवर कोणताही आक्षेप घेतला नाही. ते गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी हे काम पाहतात. तसेच एका रात्रीमध्ये नवरा बायकोला देखील घटस्फोट मिळत नाही त्यासाठी देखील सातत्याने लढा द्यावा लागतो. त्यामुळे जर अजित पवार हे शरद पवार यांना राजीनामा दिल्यानंतर देखील पुन्हा पक्षाचे अध्यक्ष करण्याच्या समिती मध्ये देखील होते. बाकी आत्ताच्या मंत्र्यांनी देखील त्याला पाठिंबा दिला होता त्यामुळे वाद हा पक्षाचा नाहीये तर सत्तेचा आहे. अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर ताशेरे ओढले आहेत.
‘अजित पवार गटाला पक्षावर ताबा हवाय म्हणून हा सगळा कट’; शरद पवार गटाच्या वकिलांचा आरोप
दरम्यान, आज झालेल्या सुनावणीत शरद पवार गटाकडून युक्तीवाद करण्यात आला. यावेळी देवदत्त कामत यांनी हा अध्यक्ष पदाचा वाद नसून एका गटाला पक्षावर ताबा हवा आहे, त्यासाठी हा कट रचला गेला, असा आरोप केला. देवदत्त कामत यांनी युक्तीवाद करतांना म्हटलं की, 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने आघाडी म्हणून निवडणूक लढवली. यामध्ये 54 आणि 44 आमदार विजयी झाले. त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना झाली. अजित पवार यांचा पक्ष विस्तारात कोणतेही योगदान वा भूमिका नाही.
शरद पवारच अध्यक्ष
ते म्हणाले, आतापर्यंत केवळ शरद पवार हेच स्थायी राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत. शरद पवार यांनीच राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे, या प्रस्तावावर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी स्वाक्षरी केली आहे. यानंतर शरद पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करण्यात आले. आणि आता मात्र, ते शरद पवार यांच्या निवडीला बेकायदेशीर संबोधत आहेत. मात्र, शरद पवार यांनीच पक्षाचा विस्तार केला. ते निर्विवाद अध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळं त्यांच्या त्यांच्या अध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नाही, असं देवदत्त कामत यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, आता पुढची सुनाणी ही बुधवारी होणार आहे. त्यावेळी अजित पवार गटाकडून युक्तीवाद केला जाणार आहे. त्यामुळं आता निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव कोणत्या गटाला मिळतं, हेच पाहणं महत्वाचं आहे.