Sanjay Raut : लोकसभा निवडणुक (Lok Sabha Elections) काही महिन्यांवर आली आहे. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली. राज्यात इंडिया आघाडीच्या नेतृत्वात महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्रित निवडणुका लढवत आहेत. काही दिवसांपूर्वीच वंचित बुहजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मविआला पत्र लिहून जागावाटपाचा फॉर्म्युला दिला होता. मात्र, अद्याप वंचितचा मविआत समावेश झाला नाही. यावर आता ठाकरे गटाने नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली.
मोदींवरील टीका भोवली! मालदीवला जाणाऱ्या सर्व प्लाईट्स बुकिंग रद्द, EaseMyTripचा मोठा निर्णय
वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होणार की नाही यावर सतत चर्चा होत असतात. मात्र, याबद्दल अधिकृतपणे कोणीच बोलत नाही. मात्र, आज माध्यमांशी बोलतांना संजय राऊत म्हणाले की, शिवसेना हा महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष आहे. वंचित बहुजन आघाडीची आमच्याशी युती आहे. त्यामुळं आम्ही असं मानतो की, वंचित हा महाविकास आघाडीचा घटक आहे, असं राऊत म्हणाले.
राऊत म्हणाले, लोकसभेच्यादृष्टीने सध्या वंचित आणि महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीविषयी फार सकारात्क आहे. आतापर्यंत त्यांच्या शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाल्या आहेत. त्यांच्याशी अतिशय सन्मानाने चर्चा होत आहे.
मला खात्री आहे की, या महाराष्ट्रातील आंबेडकरी विचारांची जनता कोणत्याही परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची नासधूस करून राज्य करणाऱ्या मोदींना पाठिंबा देणार नाही. काहीही झालं तरी संविधानंचं रक्षण व्हायला हवं, हीच प्रकाश आंबेडकरांची भूमिका आहे. महाविकास आघाडीही संविधानाच्या मुळावर घाव घालणाऱ्यांच्या विरोधात एकटवली आहे. त्यामुळंच आम्ही समविचार पक्ष आंबेडकरांना सोबत घेऊन पुढची दिशा ठरवणार आहोत, असं राऊत म्हणाले.
तर काल माध्यमांशी बोलतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले की महाविकास आघाडीत वंचितचा अद्याप समावेश झालेला नाही. वंचितच्या समावेशाबाबत शिवसेनेने महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा केली. मात्र, अद्याप त्यांनी काही सांगितलं नाही. मोदींना सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर सर्वांना एकत्र यावे लागेल, ही आमची भूमिका आहे. मात्र, एकीकडे काँग्रेस हो म्हणते, पण दुसरीकडे निर्णय देत नाही, असंही ते म्हणाले.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी याआधी अनेकदा आंबेडकरांच्या इंडिया आणि महाविकास आघाडीच्या प्रवेशासाठी आग्रह केला होता. मात्र, मात्र, काँग्रेसने हा विषय प्रलंबित ठेवला होता. मात्र, आता तीन राज्यांतील पराभवामुळे काँग्रेस काही प्रमाणात बॅकफूटवर गेली. अशा स्थितीत वंचितचा महाविकास आघाडी पर्यायाने इंडिया आघाडीत समावेश होऊ शकतो.