Download App

… म्हणून आमचे प्रिय रवींद्र धंगेकर हे शिंदे गटास प्यारे झाले, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Sanjay Raut On Ravindra Dhangekar : काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangeka) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde)

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut On Ravindra Dhangekar : काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangeka) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करत काँग्रेसला (Congress) मोठा धक्का दिला आहे. तर आता संजय राऊत (Sanjay Raut) खासदार (ठाकरे गट) यांनी यावर प्रतिक्रिया देत खळबळजनक दावा केला आहे.

माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, रवींद्र धंगेकर सुरुवातीच्या काळात शिवसेनेत होते. त्यानंतर त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आता त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. पण त्यांनी जे सांगितले की, विकास कामे होत नाही अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पण मला कळत नाही, शिंदे गटात गेल्याने त्यांच्या मतदारसंघात कोणती विकास कामे पूर्ण होणार आहे. त्यांनी त्यांच्या मतदारसंघात एखाद्या हॉस्पिटलचे प्रपोजल दिले आहे, ते थांबलं आहे का? की शैक्षणिक, आरोग्यविषयक किंवा इतर काही समाजोपयोगी कामं असतात ते थांबलेली आहेत, त्यासाठी ते चालले आहे का? शिंदे गटात, भाजपमध्ये (BJP) आणि अजित पवार गटात (NCP) जे प्रवेश सुरु आहे ते सरळसरळ भीतीपोटी सुरू आहेत. स्वतः एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी भीतीपोटी पक्षांतर केले. तसेच अजित पवारांनी भीतीपोटी पक्षांतर केले. आमच्याकडून भारतीय जनता पक्षात गेलेल्या लोकांनी देखील भीतीपोटी पक्षांतर केले. असं माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले.

पत्नींना अटक होईल या भीतीपोटी प्रवेश

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, एखाद्याने प्रवेश करावा म्हणून त्याची आर्थिक कोंडी करण्यात येत आहे. त्याच्यावर काही जुने प्रकरणे असतील तर त्याच्यावर दबाव टाकला जातो. ही एक सिस्टीम पक्षांतराच्या मागे लागलेली आहे. तसेच रवींद्र धंगेकर यांनी त्यांचे जे कोणी दैवत असेल त्यांना स्मरून सांगायला पाहिजे की, मी खरोखर विकासकामांसाठी गेलो म्हणून. कसबा मतदारसंघात एक जागा आहे. ती प्रतिभा रवींद्र धंगेकर आणि इतर पार्टनर यांच्या नावावर आहे. त्या जागेची किंमत साधारण 60 कोटी रुपये आहे असं म्हणतात. ही जागा त्यांनी विकासासाठी ताब्यात घेतल्यावर लोकसभा निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पक्षाच्या वतीने ही जागा वक्फ बोर्डाची आहे असे सांगून काही मुस्लिमांना हाताशी धरून त्यांच्याविरुद्ध भाजपचे लोक कोर्टात गेले होते. त्यांचे काम अडवण्यात आले, त्या कामाची स्टॉप ऑर्डर काढण्यात आली. त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले, त्यामुळे प्रतिभा धंगेकर (Pratibha Dhangekar) यांच्यावर अटकेची टांगती तलवार निर्माण झाली. असा खळबळजनक दावा माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी केला.

अमेरिकेत मंदीचा धोका, आशियानंतर भारतीय शेअर बाजारही कोसळला

तसेच त्यांच्या पत्नींना अटक होईल या भीतीपोटी विकासकामे रखडले आहेत, या सबबीखाली आमचे प्रिय रवींद्र धंगेकर हे शिंदे गटास प्यारे झाले. असेही यावेळी राऊत म्हणाले.

follow us