Download App

धमक्या देऊन महिलांना लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाला बोलावले; सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप

जर तुम्ही कार्यक्रमाला हजर राहिला नाही तर तुमचे नाव योजनेतून रद्द करण्यात येईल, अशा धमक्या सरकारमधील काही लोकांनी महिलांना दिल्या.

  • Written By: Last Updated:

Supriya Sule on Mahayuti : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladaki Bahin Yojna) योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ पुण्यातील बालेवाडीत करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. दरम्यान, आता याच कार्यक्रमावरून शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोठा गौप्यस्फोट केला.

लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्या सावत्र भावांना ओळखा…विखेंचा विरोधकांना खोचक टोला 

सुप्रिया सुळे यांची जळगावात पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. लाडकी बहीण योजनेवर बोलतांना त्या म्हणाल्या की, आम्ही या योजनेचं स्वागतच करू. पण या सर्व परिस्थितीत माझ्याकडे एक मेसेज आला. सरकारमधील काही लोक महिलांना धमकावत होते. याच्या संदर्भातला चॅट आपल्याके आहे. हे काही काल्पनिक नाही. किंवा दबक्या आवाजात कोणी बोललंय, असंही नाही, असं सुळे म्हणाल्या.

पुढं त्या म्हणाल्या, जर तुम्ही कार्यक्रमाला हजर राहिला नाही तर तुमचे नाव योजनेतून रद्द करण्यात येईल, अशा धमक्या सरकारमधील काही लोकांनी महिलांना दिल्या. त्याचा संपूर्ण चॅट आपल्याकडे आहे, असा गौप्यस्फोट सुळेंनी केला. त्या म्हणाल्या, कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याची धमकी देणारे हे स्वतःला भाऊ म्हणवून घेत आहेत. अशा प्रकारे धमक्या देणं हे अयोग्य आहे. सरकार ज्या प्रकारे स्वत:चे कार्यक्रम मोठे करण्यासाठी जे काही करतंय ते अतिशय अयोग्य आहे. हे सरकार इतकं असंवेदनशील असेल, असं मला वाटलं नव्हत, अशी टीका सुळेंनी केली.

पुण्यात धक्कादायक प्रकरण,अल्पवयीन मुलींचे अश्लील फोटो व्हायरल; गुन्हा दाखल 

पैसे देऊन कर्तव्य संपत नाही
आमचं सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही या योजनेचा पुढचा टप्पा म्हणून महिलांसाठी अनेक चांगल्या योजना राबवू. आम्ही सत्तेत आल्यानंतर प्रत्येक महिलेची सुरक्षितता यावरही आम्ही लक्ष देऊय पण त्यांना लोकसभेपर्यंत लाडकी बहीण का आठवली नाही? केवळ पैसे देऊन कर्तव्य संपत नाही, असा टोला सुळेंनी महायुती सरकारला लगावला.

एकनाथ शिंदे पुण्यात काय बोलले?
शिंदे म्हणाले, आम्ही संघर्ष करून इथपर्यंत आलो. म्हणूनच आम्ही अनेकांना पुरून उरलोय. एवढचं नाही तर सावत्र आणि कपटी भावांवर मी मात करून इथपर्यंत आलो. त्यामुळे सावत्र भावांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. त्यांना योग्य वेळी योग्य जागा दाखवा. लाडकी बहिण योजना बंद व्हावी म्हणून ते कोर्टात गेले. पण, न्यायालयाने त्यांना चपराक दिली. न्यायालयाने बहिणींच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे जेव्हा-जेव्हा संधी मिळेल तेव्हा सावत्र भावांना जोडे दाखवा, अस आवाहन शिंदेंनी केलं.

follow us