‘तेव्हापर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही’, फडणवीसांकडून मोठी घोषणा, लाखो महिलांना दिलासा
Devendra Fadnavis : महायुती सरकार ‘देना बँक’ सारखं आहे ते देत असतं लेना बँकवाला सरकार नाही आहे, मागच्या काळात आपण बघितलं वसुली करणार सरकार होतं मात्र आता वसुली करणारा नाहीतर बहिणींना देणारा सरकार आहे अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुण्यात आयोजित वचनपूर्ती सोहळ्यात महाविकास आघाडीवर (MVA) केली.
या कार्यक्रमात बोलताना फडणवीस पुढे म्हणाले की, आम्ही आतापर्यंत 1 कोटी 3 लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी 3 हजार रुपये जमा केले आहे आणि ज्या बहिणींच्या खात्यात पैसे आले नाही त्यांच्या खात्यात देखील लवकरच पैसे जमा होणार आहे आणि जेव्हापर्यंत प्रत्येकाच्या खात्यात पैसे जमा होणार नाही तेव्हापर्यंत योजना बंद होणार नाही अशी ग्वाही देखील यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच ही खटाखट सारखी योजना नाही तर फटाफट सारखी योजना आहे असा टोला देखील यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लावला.
जेव्हा आम्ही या योजनेची घोषणा केली होती तेव्हा तुमच्या सावत्र भावांच्या पोटात दुखत होतं त्यामुळे त्यांनी ही योजना बंद करण्याचे प्रयत्न केले. ते पहिल्यांदा कोर्टात गेले मात्र कोर्टाने त्यांना नाकरल्यानंतर त्यांनी तुमचे फॉर्म नाकारण्यात यावे यासाठी प्रयत्न केले तसेच या लोकांनी या योजनेसाठी सुरु असणारा पोर्टल बंद करण्याचा प्रत्यन केला असा आरोप देखील यावेळी फडणवीस यांनी केला.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना विकसित भारत तयार करायचा आहे त्यामुळे ते नेहमी सांगतात भारताला विकसित करण्यासाठी देशातील 50 टक्के लोकसंख्या म्हणजे महिलांचा विकास होणे आवश्यक आहे असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच जे लोक हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर 2 हजार रुपयांची टीप देतात त्यांना 1500 रुपयांचे महत्व समजणार नाही, त्यामुळे ते लोक आमच्यावर टीका करत आहे आणि जर हे लोकं सत्तेत आले तर सगळ्यात आधी शिंदे सरकारच्या योजना बंद करणार असं देखील ते म्हणाले.
SEBI प्रमुख पुन्हा अडचणीत, हिंडेनबर्गनंतर नव्या अहवालाने वाढवले टेन्शन?
ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे त्या राज्यात ही योजना नियमित सुरु आहे. महाराष्ट्रात देखील ही योजना नियमित सुरु राहणार अशी ग्वाही देखील या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी दिली.