Download App

200 आमदार असूनही तोडगा निघेना, सरकार दोन्ही समाजाची फसवणूक करतेय; सुळेंचे टीकास्त्र

राज्य सरकारकडून फक्त जुमलेबाजी सुरू आहे. हे सरकार या दोन्ही समाजाची फसवणूक करत आहे. - सुप्रिया सुळे

  • Written By: Last Updated:

Supriya Sule : राज्यात आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) सरकारला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी 13 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. तर लक्ष्मण हाकेंनी ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ दहा दिवस उपोषण केलं. आज हे उपोषण स्थगित झालं. मात्र, मराठा समाजाच्या मागण्या आणि ओबीसी समाजाचा विरोध यामुळे मराठा आणि ओबीसींमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. याच आरक्षणाच्या मुद्यावर आता खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाष्य केलं.

नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांचा राजीनामा 

सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. एकीकडे सरकारने सगेसोयरेबाबत जरांगेंना आश्वासन दिलं तर दुसरीकडे सरकार ओबीसी आरक्षणाच्या व्यासपीठावर वेगळी भूमिका घेत आहे, याविषयी विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कोणीही आंदोलन करत असेल तर संवेदनशील सरकारने त्यांच्याशी चर्चा करून तोडगा काढणं आवश्यक आहे. या सरकारकडे दोनशे आमदार आहेत. त्यामुळे आरक्षणाबाबत मार्ग काढणे गरजेचे आहे. इच्छा असेल तर ते क्रांती घडवू शकतात. मात्र, त्यांच्याकडे इच्छाशक्तीच नाही, असा टोला सुळेंनी लगावला.

अभिनेता सुशांत शेलार पुन्हा चर्चेत, पडद्यामागच्या कलाकारांसाठी दिली मोठी भेट 

या सरकारकडून फक्त जुमलेबाजी सुरू आहे. हे सरकार या दोन्ही समाजाची फसवणूक करत आहे. महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी यांच्यात सुरू असलेला संघर्षला सर्वस्वी सरकार आणि सरकारची ध्येयधोरणे जबाबदार आहे. हे सरकार अत्यंत असंवेदनशील असून त्यांना फक्त घर आणि पक्ष फोडा इतकचं येत, असा अशी टीका सुळेंनी केली.

मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लीम समाजाच्या आरक्षणाबाबत 10 वर्षापूर्वी आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये हे करू असं बारामतीतून भाजपच्या नेत्यांनी सांगितलं होतं. मात्र गेले दहा वर्ष सातत्याने सरकार आम्ही हे करू असं सागत असलं तरी प्रत्यक्षात काही झालेलं नाही. गेल्या दहा वर्षांपासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांचं सरकार आहे. आता नंबर कमी झाले असले तरी दिल्लीत आणि राज्यात त्यांचं सरकार आहे. त्यामुळं आरक्षणाच्या बदला संदर्भातील ठराव त्यांनी मांडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष त्यांच्या बाजून ठामपणे उभा राहील, असंही सुळे म्हणाल्या.

 

follow us