अजितदादांचे आमदार परतणार का? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘तसा प्रस्ताव आला…’

अजितदादांचे आमदार परतणार का? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘तसा प्रस्ताव आला…’

Supriya Sule : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) बोलावलेल्या बैठकीला पाच आमदारांनी दांडी मारली होती. त्यामुळं अजित पवार गटाच्य आमदारांमध्ये अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे. रोहित पवारांनी अजित पवार गटाचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचं विधान केलं होतं. दरम्यान, आता खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) याबाबत भाष्य केलं.

5000 कोटींचा मालक असणारा खासदार झाला मोदी सरकारमध्ये मंत्री! चंद्रबाबू नायडूशी आहे खास संबंध 

आज शरद पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीला सर्व राज्यातील अध्यक्ष हजर राहिले होते. त्यानंतर सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. अनेक राज्यांमध्ये मी जाऊन संघटना बांधण्यासाठी वेळ द्यावा, अशी विविध राज्यातील अध्यक्षांची मागणी आहे. त्यानुसार, आम्ही विविध राज्यांमध्ये जाऊन पक्ष वाढवणार आहोत. पूर्ण ताकदीने आम्ही कामाला लागलो आहोत, असं सुळे म्हणाल्या.

PM Modi Cabinet : मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पियूष गोयलसह ‘या’ खासदारांनी घेतली शपथ 

अजित पवार गटातील आमदार परत येणार का, असं विचारलं असता सुळे म्हणाल्या की, काही आमदार परत येत असतील असतील तर त्यासंदर्भात आमची वर्किंग कमिटी निर्णय घेईल. माझ्या पोटात खूप काही राहतं, त्यामुळं मी यावर बोलणार नाही. जर कोणी परत येण्याचा विचार करत असेल, तसा प्रस्ताव आला तर त्यावर शरद पवार आणि वर्किंग कमिटी निर्णय घेईल, असं सुळे म्हणाल्या.

शिंदे गटाची बोळवण? प्रतापराव जाधवांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ 

शपथविधीचं निमंत्रण आलं, पण…
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण मिळालं होतं का? असं विचारलं असता सुळे म्हणाल्या की, निमंत्रणासाठी शरद पवारांना आणि मलासुध्दा फोन आला होता. मात्र, आज आमची संघटनात्मक बैठक होती आणि उद्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे आमच्यापैकी कोणीही हजर राहणार नसल्याचे आम्ही कळवलं होतं, असं सुळे म्हणाल्या.

… त्यात नवल नाही.
अजिदादा गटाला मंत्रिपद मिळत नाही, याबाबत बोलातांना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी दुसऱ्याच्या घरात ढवळाढवळ करत नाही. मी दहा वर्षांपासून भाजपचं मित्रपक्षांसोबतचं वागणं जवळून पाहिलं आहे. भाजपचं आजवरचं वागणं पाहिलं तर अजित पवार यांच्या पक्षाला मंत्रिपद मिळाले नाही यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, असं सुळे म्हणाल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube