Download App

पक्ष, चिन्ह जाताच सुप्रिया सुळेंचं लोकसभेत पहिलं भाषण; मोदी सरकारला घेरलं

Supriya Sule News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भात निवडणूक आयोगाकडून निर्णय देण्यात आल्यानंतर आज खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लोकसभेत भाषण करत मोदी सरकारला चांगलच घेरलं आहे. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी देशातील महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्नांवरुन मोदी सरकरला घेरलं आहे. राज्यात पाण्याविना शेतकरी अडचणीत सापडला असून मनमोहन सिंग सरकारप्रमाणे मोदी सरकारने शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

‘चोर न्यायाधीश झाला अन् चोरांना सोडून दिलं’; NCP च्या निर्णयावर ठाकरेंची बोचरी टीका

सुळे म्हणाल्या, देशात बेरोजगारी, महागाई शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. महाराष्ट्रात पाण्याची टंचाई असून शेतकऱ्यांसाठी पाण्याचा प्रश्न लक्ष घालून सोडवा. महाराष्ट्रातले खासदार याकडे दुर्लक्ष करीत आहेत. शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही. सोयाबीनला भाव नाही, दूधाला नाही, सरप्लस दिलं पण शेतकऱ्यांकडे पैसे पोहोचले नाहीत. पाणी नसल्याने शेतकरी अडचणीत असून शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं पाहिजे, असा पवित्राच सुप्रिया सुळेंनी घेतला होता.

दोन्ही बाजूंनी प्रतिज्ञापत्र देणारे 5 आमदार अन् CM शिंदेंच्या मंत्र्याचा दावा; नेमकं ‘पॉलिटिक्स’ काय?

तसेच हे सरकार गरीबांचं आहे असं ते म्हणतात पण देशातल्या 80 टक्के गरीबांना अन्न धान्य देत आहात. गरीबांना अन्नधान्य देण्याचा जो आकडा आहे तो का कमी होत नाही. गरीबांसाठी जनधन योजना होती पण 50 करोडोंपेक्षा अधिक खाते सक्रिय नाहीत. त्यात वाचलेले पैसे आहेत त्यांना 3 ते 5 टक्क्याने पैसे का दिले जात नाही. गरीबांना वाटा ना पैसे हे सुचवतेयं मी, असंही सुळे म्हणाल्या आहेत.

Pune : “ए घायवळ… ए मारणे… तुला समजलं का?” : नवीन आयुक्तांचा पुण्यातील गुंडांना जाहीर दम!

गरीबांचं सरकार असेल तर त्यांना पैसे द्या. देशात आणि महाराष्ट्रात बेरोजगारी वाढत चालली आहे. साडेसात लाख नोकऱ्यांसाठी 22 करोड लोकांनी अर्ज केला आता सांगा बेरोजगारी हटली का? पीएचडी, युजीसीचे विद्यार्थी पोलिस खात्यात काम करण्यास इच्छूक आहेत ते अर्ज करीत आहे, त्यावरुन लक्षात येतं की बेरोजगारी हटली की नाही? असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Manoj Jarange : ते राष्ट्रपती झाले तरी आम्ही ओबीसीतूनच आरक्षण मिळवू; जरांगेंच भुजबळांना पुन्हा एक चॅलेंन्ज

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय जाहीर केला आहे. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला उद्या (7 फेब्रुवारी) चिन्हाबाबत माहिती देण्यास सांगितले आहे.

follow us