Download App

कॉपी पेस्ट निकालावर काय बोलू? सुप्रिया सुळेंनी निकालाची खिल्लीच उडवली…

Image Credit: letsupp

Supriya Sule On Diqualification Mla : मी कॉपी पेस्ट निकालावर काय बोलू, अदृश्य शक्तीच्या आदेशानूसार निकाल समोर आला असल्याचं म्हणत खासदार सुप्रिया सुळे (Surpriya Sule) यांनी राष्ट्रवादीच्या अपात्र आमदार प्रकरणावर हसूनच प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीच्या आमदार अपात्र प्रकरणी विधी मंडळात सुनावणी सुरु होती. सुनावणीनंतर अखेर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) दिला आहे. या निकालामध्ये मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार गटाचाच असून दोन्ही गटाचे आमदार नार्वेकरांनी पात्र ठरवले आहेत. या निकालानंतर सुप्रिया सुळेंनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

तमन्ना भाटिया बनली ‘या’ ब्रॅण्डची ब्रॅण्ड ॲम्बेसेडर, ‘डियाताल डी’सोबत तमन्नाचं अनोखं नातं

सुप्रिया सुळे म्हणाल्या, जे शिवसेनेचे झालं तेच राष्ट्रवादीचं झालं आहे, त्यामुळे आश्चर्य किंवा काही वाटत नाही, नियम, कायदे मोडूनच करायचं ठरवलं आहे त्यात काही वेगळं नाही. वरचं फक्त नाव बदललं आहे बाकी सगळं तेच आहे. जे उद्धव ठाकरेंवर होतं ते एक महिन्यांनी शरद पवारांवर होत आहे. स्थानिक मराठी पक्षांना कसं कमकुवत करायंच, त्यांच्यावर अन्याय करायचा, मराठी अस्मितेचा अपमान करुन संपवायचं पाप हे अदृश्य शक्ती करत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला आहे.

Kansas Shooting : अमेरिकेत क्रीडा स्पर्धेदरम्यान अंदाधुंद गोळीबार; दोघांचा मृत्यू, 22 जखमी

नार्वेकरांकडून काय अपेक्षा करणार?
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून काय अपेक्षा करणार, त्यांच्याकडून अपेक्षा करणं हे हास्यास्पद आहे. तुम्ही तो डेटा पाहा त्यावरुन आम्हाला वेगळी ऑर्डर अपेक्षित नव्हतीच. सर्व नियम, कायदे, संविधान मोडूनच हे काम सुरु आहे. अदृश्य शक्ती सांगते आणि हे लोकं ड्राफ्टींग करतात. विधानसआ अध्यक्षांचा फार मान असतो पण आता हे कॉपी पेस्ट करायला लागले असल्याचा आरोपही सुळे यांनी केला आहे.

भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एक पत्र लिहिलं आहे, त्यात म्हटलं की भाजपात काय चाललं. या पत्रात त्यांनी भाजपमध्ये सुरु असलेल्या अनेक गोष्टींवर थेट भाष्य केलं आहे. स्वामी यांचं पत्र वाचल्यानंतर कुठं लोकशाही आणि कुठं दडपशाही हे तुम्हाला कळेल, अशी बोचरी टीकाही सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालानंतर आता आम्ही न्यायलायत जाणार असून आधीही गेलो आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी हे मोठे पक्ष असून भाजपला कोणताही नेता मोठा होत असेल तर सहन होत नाही . काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचे नेते त्यांना सहनच होत नाहीत, त्यामुळे त्यांच्यामागे ईडी सीबीआय लावत असल्याचंही सुप्रिया सुळेंनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

follow us

वेब स्टोरीज