Download App

‘विटंबनेमागचा मास्टरमाईंड शोधा, हा कट सुनियोजित…’; वर्षा गायकवाड यांना वेगळीच शंका…

हा कट सुनियोजित तर नव्हता ना, या प्रकरणामागे कोणी मास्टरमाईंड आहे का? याची चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी- वर्षा गायकवाड

  • Written By: Last Updated:

Varsha Gaikwad : परभणी (Parbhani) शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळा परिसरात संविधानाची (Constitution) प्रत ठेवण्यात आली होती. एका माथेफिरुने काल (दि. 11 डिसेंबर) सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान त्या संविधानाच्या प्रतीची विटंबना केली. या घटनेनंतर आंबेडकरी अनुयायी संतप्त झालेत. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अपमान करण्याची हिंमत होतेच कशी? असा संतप्त सवाल खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी केला.

धक्कादायक, साताऱ्यात जामिनासाठी न्यायाधीशांनीच घेतली 5 लाखांची लाच, गुन्हा दाखल 

तसेच हा कट सुनियोजित तर नव्हता ना, या प्रकरणामागे कोणी मास्टरमाईंड आहे का? याची चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली.

वर्षा गायकवाड यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. परभणीतील घटनेविषयी विचारले असता त्या म्हणाल्या की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परभणीतील पूर्णाकृती पुतळ्या समोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना करण्याची घटना अत्यंत संतापजनक आणि निंदनीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अपमान करण्याची हिंमत होतेच कशी? असा संतप्त गायकवाड यांनी केला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीची कसून चौकशी करावी आणि या प्रकरणामागे कोणी मास्टरमाईंड आहे का? याची चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.

सतीश वाघ यांच्या हत्येचं गूढ उकललं; जुन्या वादातूनच दिली 5 लाखांची सुपारी, अन्… 

पुढं त्या म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परभणीतील पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना करण्याच्या कटाच्या निषेधार्थ पुकारलेल्या परभणी शहर आणि जिल्हा बंदला माझे समर्थन आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान भीमसैनिक कदापी खपवून घेणार नाहीत. हा कट सुनियोजित तर नव्हता ना, याची देखील चौकशी व्हायला हवी. समाजात अपप्रवृत्ती बळावत चालली आहे त्याला वेळीच आळा घातला पाहिजे. केंद्रात व राज्यातील भारतीय जनता पक्षाचे मनुवादी सरकार हे संविधान विरोधी असून हे सरकार अशा घटनांना आळा घालण्यात कमी पडत आहे, अशी टीका वर्षा गायकवाड यांनी केली.

राज्यघटनेचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्व अनुयायी संविधान व लोकशाही माननारे आहेत. परभणीची घटना अत्यंत निषेधार्ह आहे, या घटनेचा निषेध लोकशाही मार्गानेचे करा आणि अफवांना बळी पडू नका, असे आवाहनही खासदार वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

follow us