Download App

संदीप नाईक तुतारी होती घेणार का? वडील गणेश नाईक म्हणाले, ‘त्यांना निर्णय घेण्याचं…’

आमदार गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.

  • Written By: Last Updated:

Sandeep Naik Will Join Sharad Pawar Grorup : लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरू झाली. आता भाजपमध्ये (BJP) नाराज असलेले आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांचे पुत्र संदीप नाईक (Sandeep Naik) हे देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

दाक्षिणात्य ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री दिसणार ‘रानटी’ चित्रपटात, साकारणार महत्वाची भूमिका 

भाजपने काल 99 उमदेवारांची यादी जाहीर केली. या यादीत संदीप नाईक यांचे वडील गणेश नाईक यांना ऐरोली विधानसभा मतदारसंघातून तर बेलापूर विधानसभेतून आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी दिली. मात्र, बेलापूरमधून संदीप नाईक इच्छुक होते. आपल्याला उमेदवारी मिळाली नसल्याने ते आपल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. 21) शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय माहिती सुत्रांनी दिली.

Ashutosh Kale : मोठी बातमी! राष्ट्रवादीकडून आ.आशुतोष काळेंची उमेदवारी जाहीर 

2019 मध्ये गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, गणेश नाईक वगळता त्यांच्या कुटुंबातील कोणालाही उमेदवारी मिळाली नाही. आताही गणेश नाईक यांनाच भाजपकडून उमेदवारी मिळाली. संदीप नाईकांना डावलण्यात आलं. त्यानंतर बेलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक संदीप नाईक निवडणूक लढवणार असल्याचं पोस्टर व्हायरल झालं. त्यामुळं आता ते बंडखोरी करून निवडणूक लढवणार असं बोलल्या जातं. शरद पवार गटाकडून संदीप नाईक यांना बेलापूर विधानसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ते शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा आहचे.

दरम्यान, संदीप नाईक यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत बोलताना गणेश नाईक म्हणाले की, त्यांनी पक्षाचा आदेश मानावा. पण, आपल्यावर अन्याय झाला असं त्यांना वाटत असेल तर त्यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. ते जो निर्णय घेतील तो त्यांचा निर्णय असेल. नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयांवर मी बोलू इच्छित नाही. भाजपमध्ये नाराजी किंवा वक्तव्याला किंमत नाही. लोकशाहीमध्ये कोणाचा आवाज दाबू शकत नाही, असं गणेश नाईक म्हणाले.

ज्योती मेटेंचाही शरद पवार गटात प्रवेश
आज शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला आहे. बीडमधून शरद पवार गटाकडून ज्योती मेटे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

follow us