Nashik : शिंदे गटाला हायकोर्टाचा मोठा धक्का! ठाकरेंच्या गोटात उत्साहाचं वातावरण

Shivsena : नाशिकमधील म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या लढाईमध्ये उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray group) विजय झाला आहे. नाशिक महानगरपालिकेतील म्युनिसिपल कामगार सेनेच्या कार्यालयाचा ताबा शिवसेना (UBT) कडे देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिले आहेत. हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.  (mumbai-high-court-shock-to-shivsena-shinde-group-nashik-municipal-worker-office-thackeray-group) Mamata Banerjee : ममतांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग; जखमी […]

Eknath Shinde Uddhav Thackeray

Eknath Shinde Uddhav Thackeray

Shivsena : नाशिकमधील म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या लढाईमध्ये उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray group) विजय झाला आहे. नाशिक महानगरपालिकेतील म्युनिसिपल कामगार सेनेच्या कार्यालयाचा ताबा शिवसेना (UBT) कडे देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिले आहेत. हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.  (mumbai-high-court-shock-to-shivsena-shinde-group-nashik-municipal-worker-office-thackeray-group)

Mamata Banerjee : ममतांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग; जखमी बॅनर्जींना तातडीने रुग्णालयात हलवले

म्युनिसिपल कर्मचारी कार्यालायावर शिंदे गटाकडून दावा करण्यात आला होता. त्यामुळे काहीसा वाद निर्माण झाला होता, त्यानंतर नाशिक पोलिसांनी या कार्यालय काही काळासाठी बंद करुन टाकले होते. त्यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले. त्यात या प्रकरणाचा निकाल शिवसेना ठाकरे गटाच्या बाजूने लागला. त्यामुळे हा शिंदे गटाला एक मोठा धक्काच मानला जात आहे. या निर्णयानंतर आता ठाकरे गटामध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे.

संभाजी भिडेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन वाद चिघळला, संभाजी ब्रिगेड आक्रमक

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर 21 ऑक्टोबर 2022 ला नाशिक महानगरपालिका कामगार संघटनेच्या कार्यालयाचा ताबा घेण्यावरुन वाद झाला. म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे तत्कालीन अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी ठाकरे गटातून शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यामुळे हा वाद समोर आला होता. दोन गटातील वाद चिघळण्याची शक्यता पाहून त्यानंतर चार दिवसांमध्ये पोलीस प्रशासनाने महानगरपालिकेतील हे कार्यालय सील केले. त्याच्या विरोधात ठाकरे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र आता या लढाईत शिंदे गटाला ठाकरे गटासमोर हार सहन करावी लागली आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटात उत्साहाचं वातावरण आहे.

Exit mobile version