शरद पवारांनी फिरवला नवाब मलिकांना फोन; दोघांत नेमकी काय झाली चर्चा?

Sharad Pawar Phone to Nawab Malik : मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक दोन महिन्यांच्या जामीनावर बाहेर आले आहेत. यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेते मंडळींनी त्यांच्या भेटी घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर आता आणखी एक अशीच मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवाब मलिक यांना फोन […]

Sharad Pawar And Nawab Malik

Sharad Pawar And Nawab Malik

Sharad Pawar Phone to Nawab Malik : मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक दोन महिन्यांच्या जामीनावर बाहेर आले आहेत. यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेते मंडळींनी त्यांच्या भेटी घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर आता आणखी एक अशीच मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवाब मलिक यांना फोन केल्याची माहिती आहे.

मलिक यांना न्यायालयाने वैद्यकिय कारणांमुळे जामीन दिला आहे. सुटका झाल्यापासून मलिक यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. नेते मलिक यांच्या भेटी घेत आहेत. अजित पवार यांनीही त्यांची चौकशी केल्याने वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर आता शरद पवार यांनीही मलिक यांच्याबरोबर फोनवर चर्चा केली आहे. शरद पवार यांनी फोनवर मुख्यतः मलिक यांच्या प्रकृतीची चौकशी केली. मलिक बाहेर आल्यानंतर ते कोणत्या गटात जातील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र त्यांनी अद्याप कोणतीच भूमिका जाहीर केलेली नाही.

CM Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळेल झटपट! सरकारने आणलं खास मोबाइल अ‍ॅप

मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर आधी खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी मलिकांची भेट घेतली होती. दोन्ही गटाच्या नेत्यांनी भेटी घेतल्याने मलिक आता कोणत्या गटात जाणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता याबाबत काही अंदाज बांधणे कठीणच आहे. या घडामोडींवर अद्याप मलिक यांनी मात्र काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

शरद पवार गटाचे प्रयत्न

जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या कार्यकारी अध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मलिक यांची रुग्णालयात भेट घेतली. यावेळी मी पक्षासाठी नाही तर माझ्या मोठ्या भावासाठी आली असल्याचे म्हणतं भावना व्यक्त केल्या होत्या. तसंच नवाब मलिकांवर खरंच अन्याय झाला असून कुटुंबियांसह राष्ट्रवादी पक्षाने त्यांच्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. कुटुंबियांनीही खूप काही सहन केलं आहे, त्यामुळे शेवटी सत्य बाहेर येतंच, असं म्हणत सुळेंनी मलिक लवकरच न्यायालयाच्या कचाट्यातून बाहेर पडणार असल्याचे संकेत दिले.

नवाब मलिकांसाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची फिल्डिंग; आधी सुळे अन् आता तटकरे, पटेलांनी घेतली भेट

अजित पवार गटाकडूनही फिल्डिंग

जामिनानंतर मलिक यांच्या स्वागतासाठी कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांनी काल कार्यकर्त्यांना बोलावले होते. त्यानंतर आज खासदार प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनीही मलिक यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे ते नेमके कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Exit mobile version