Download App

Eknath Shinde : ‘नाराजी’ अन् ‘कोल्डवॉर’वर CM शिंदेंची डिनर डिप्लोमसी ठरणार गेमचेंजर

CM Eknath Shinde : अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या समर्थक आमदारांसह सरकारमध्ये एन्ट्री घेतल्यापासून सगळा खेळच पालटला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असतानाच अजित पवार आले अन् स्वतःसह समर्थक आमदारांना मंत्रीपदेही मिळवली. शिंदे गटाचे आमदार तसेच राहिले. त्यानंतर धुसफूस इतकी वाढत गेली की एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची खुर्चीच धोक्यात असल्याची चर्चा सुरू झाली. शिंदे आणि अजित पवार यांच्यातील कोल्डवॉर सुरू असल्याच्या बातम्या आल्या. अशातच आता आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. गुरुवारी (17 ऑगस्ट) संध्याकाळी 7 वाजता वांद्रे येथील ताज लँड्स एन्ड या हॉटेलमध्ये स्नेहभोजन पार पडणार आहे. अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांन सर्व मंत्र्यांसाठी आयोजित केलेले हे पहिलेच स्नेहभोजन आहे. त्यामुळे शिंदेंच्या या डिनर डिप्लोमसीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे.

‘आमदार फोडू नका, पक्ष उभा करायला शिका’; राज ठाकरेंनी भाजपलाही धुतलं

राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून अशा काही घडामोडी घडल्या आहेत. ज्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा वारंवार समोर येत आहेत. दीड वर्ष उलटून गेल्यानंतरही शिंदे गटातील बऱ्याच आमदारांना मंत्रीपदे मिळालेली नाहीत. आता अजित पवारांचा गट सत्तेत आल्याने मंत्रीपद मिळण्याच्या सर्व शक्यता मिटल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यात राज्यातील मुख्यमंत्री बदलाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

कोल्डवॉरला पूर्णविराम मिळणार ?

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या वॉररुममध्ये प्रकल्पांची आढावा बैठक घेतली. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अधिकारावर अतिक्रमण झाल्याचा मुद्दा उपस्थित करत दोघांत कोल्डवॉर सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. माध्यमांनीही हा मुद्दा उचलून धरला. त्यानंतर स्वतः अजित पवार यांनीच खुलासा करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. माध्यमांनाही फटकारले होते. या कारणामुळेच शिंदे नाराज असल्याचे बोलले गेले. यानंतर शिंदे साताऱ्यातील त्यांच्या गावी निघून गेले होते. शिंदेंच्या नाराजीच्या चर्चा वाढल्या.

Raj Thackeray : अजितदादांची नक्कल, 70 हजार कोटींचा घोटाळा अन् भाजपमध्ये टुणकन उडी

या घडामोडींच्या पार्श्वभुमीवर एकनाथ शिंदे यांनी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट), आणि भाजप या तिन्ही पक्षांचे मंत्री सहकुटुंब उपस्थित राहणार आहेत. आता सूत्रांकडून अशीही माहिती मिळत आहे की अजित पवारांबरोबरच्या कोल्डवॉरला तसेच मु्ख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पूर्णविराम देण्याच्या उद्देशाने या स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता या स्नेहभोजनाला कोण कोण उपस्थित राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us