Download App

रुपाली ठोंबरे पाटील यांचं नाव घेताच, Sharad Pawar म्हणाले, ‘पोलिसांनी जर त्रास दिला तर…

मुंबई : MPSC परीक्षेच्या (MPSC Exam) नव्या पेपर पॅटर्नविरोधामध्ये आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांच्या मागण्या अखेर एमपीएससी आयोगाने (MPSC Commission) मान्य केल्या आहेत. जवळपास ६ महिन्यांचा लढा यशस्वी झाल्यावर परीक्षार्थींनी ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांची भेट घेतली आहे. आमच्या मागण्यांना, आणि आंदोलनाला आपण पाठिंबा दिला. आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलात. रात्री ११ वाजता आमच्या आंदोलनस्थळी येऊन भेट देऊन आमच्या व्यथा जाणून घेतल्या, याबद्दल आपले आभार मान्यासाठी आम्ही आज तुम्हाला भेटीला आलो आहोत, असं परीक्षार्थींनी पवार यांना यावेळी सांगितलं.

तसेच एका विद्यार्थ्यांनी शरद पवारांना प्रश्न केला की, आधी मनसेच्या तर आता राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) यांनी रात्रभर MPSC विद्यार्थ्यांन सोबत राहिल्याने विद्यार्थ्यांचा देखील कॉन्फिडन्स वाढला होता, पवारांनी मिश्किल शैलीत विद्यार्थ्यांची फिरकी घेतली, यावरून रुपाली पाटलाचं नाव काढताच शरद पवार यांनी “ती तर भांडखोर आहे फार”, “पोलिसांनी जर त्रास दिला तर… ती पोलिसांच्या अंगावर जाते”, असं पवार म्हणताच विद्यार्थ्यांमध्ये हसू पिकलं यावरून शरद पवारांना देखील हसू अनावर झालं. त्यांच्यामुळे आज मुली देखील सुरक्षित आहेत, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी यावेळी दिली आहे.

Kasba By Election : कसब्यातील मतदार हिंदुत्ववादी : फडणवीस यांनी केली मांडणी

एमपीएससी मुख्य परीक्षात नवा पॅटर्न २०२५ पासूनच लागू होणार आहे, असा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिला आहे. परीक्षार्थींना पाठिंबा देण्यासाठी २ दिवसांपासून आंदोलन करत होते. त्या आंदोलना ज्येष्ठ नेते शरद पवार रात्री ११ वाजता पुण्यातील आंदोलनस्थळी आले होते. त्यांच्या या व्यथा-वेदना जाणून घेतल्या.

आंदोलनस्थळावरुन शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करुन या प्रकरणी तातडीने लक्ष घालावी, अशी सूचना शरद पवार यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील एमपीएससी आयोगाला पत्र लिहिलं. यानंतर एमपीएससीने ट्विट करुन विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्याचं सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मोठा जल्लोष केला.

Tags

follow us