पुणे : बजेट हे देशाची दिशा दाखवणारं असतं. भविष्याची वाटचाल कशी असणार आहे हे बजेटमधून कळतं. एकीकडे आर्थिक मंदी आली असताना भारताची अर्थव्यवस्था (economy) कशी लढेल ही निर्मल आशा देखील धुळीस मिळाली आहे. ह्या संपूर्ण अर्थसंकल्पातून (Union Budget 2023 ) सर्वसामान्यांना काही मिळेल असे काही चित्र नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी अर्थसंकल्पावर दिली.
गेले अनेक वर्षे बजेट बघतोय. बजेट म्हणचे फुगवलेले आकडे असतात. बाकी त्यात सत्यता काही नसते. ज्या पध्दतीने जीडीपी मॅनेज करतात. ती पध्दत बघितल्यावर सगळे अर्थसंकल्प फुगवलेले फुगे आहेत. याव्यतिरिक्त या फुग्यांमध्ये काही नाही, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.
आ. आव्हाडांचा जसा इतिहासाशी संबंध नाही, तसा तो अर्थशास्राशीही नाही !
अकलेचे तारे तोडल्याशिवाय यांना विचारणार तरी कोण?@BJP4Maharashtra pic.twitter.com/hdHrkn2uiT
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) February 1, 2023
त्यावर भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी टीका केली आहे. मोहोळ यांनी एक ट्विट करून “आ. आव्हाडांचा जसा इतिहासाशी संबंध नाही, तसा तो अर्थशास्राशीही नाही ! अकलेचे तारे तोडल्याशिवाय यांना विचारणार तरी कोण?” अशी टीका केली आहे.