माझ्याकडे अनुभवाची शिदोरी, कोणाच्या डोक्यात काही हवा असेल तर…., राणी लंकेंनी विरोधकांना फटकारलं

MVA Candidate Rani Lanke Sabha In Parner : पारनेर विधानसभा मतदारसंघातील (Assembly Election 2024) महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांनी पुणेवाडेच्या भैरवनाथ देवस्थान येथे प्रचाराळा नारळ फोडलाय. यावेळी राणे लंके यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय. राणी लंके म्हणाल्या की, माझं शिक्षण, माझ्या भाषणावर निवडणूकीच्या प्रचारात टीका केली जातेय. कुणाच्या डोक्यात काय हवा आहे? हे मला सांगता […]

Rani Lanke

Rani Lanke

MVA Candidate Rani Lanke Sabha In Parner : पारनेर विधानसभा मतदारसंघातील (Assembly Election 2024) महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांनी पुणेवाडेच्या भैरवनाथ देवस्थान येथे प्रचाराळा नारळ फोडलाय. यावेळी राणे लंके यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय. राणी लंके म्हणाल्या की, माझं शिक्षण, माझ्या भाषणावर निवडणूकीच्या प्रचारात टीका केली जातेय. कुणाच्या डोक्यात काय हवा आहे? हे मला सांगता येत नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा नियोजन समितीमध्ये मी काम केलंय. त्या माध्यमातून मोठा निधी आणला आहे. माझ्याकडे अनुभवाची शिदोरी असून कोणाच्या डोक्यात काही हवा असेल तर ती काढून टाका, २३ तारखेनंतर मी कसे काम करते हे कृतीतून सिध्द करेल असे सांगत महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके (Rani Lanke) यांनी विरोधकांना फटकारलं.

लंके यांच्या प्रचारार्थ पुणेवाडी येथे कान्हूरपठार गट आणि पारनेर शहरातील प्रचाराचा नारळ पुणेवाडीच्या भैरवनाथ मंदिरात फोडण्यात आला. त्यावेळी त्यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. यावेळी कान्हूर पठार जिल्हा परिषद गट तसेच पारनेर शहरातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना लंके म्हणाल्या की, प्रचारानिमित्त प्रत्येक गावात घेण्यात आलेल्या घोंगडी बैठकींना मोठा प्रतिसाद मिळाला. ही निवडणूक जनतेने हाती घेतली असून उमेदवारही जनतेनेच निवडला आहे.

लाडकी बहीण फक्त मतदान करण्यासाठीच, संभाजीनगर जिल्ह्यातल्या प्रमुख ९ ठिकाणी दोनच महिला उमेदवार

खासदार निलेश के यांनी आमदार असताना साडेचार वर्षात दोन हजार कोटींचा निधी आणला. उर्वरीत कामांची पुर्तता भविष्यकाळात होणार आहे. पंचायत समितीच्या निवडणूकीपासून मला महिलांची साथ मिळतेय. अर्ज दाखल करताना मोठ्या संख्येने महिला होत्या. त्याचं कारण एक महिला भगिनी आमदार होणार याचा आनंद आहे. शरद पवार यांनी आरक्षण दिले, त्याचा फायदा घेतला पाहिजे. महिलांना सक्षम करण्यासाठीच मी आमदार होणार आहे. महिलेच्या हाती रोजगार कसा मिळेल? त्यांना व्यासपीठ कसे मिळेल? यासाठी मी पुढाकार घेणार आहे. घोंगडी बैठकांमध्ये महिला बोलू लागल्या, व्यासपीठावर बसू लागल्या असल्याने महिलांच्या सक्षमीकरणाची ही सुरूवात झाल्याचे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही, असं लंके यांनी सांगितलंय.

लंके पुढे म्हणाल्या, मी मोठ्या मताधिक्याने विजयी होणारच आहे. प्रश्न फक्त मताधिक्याचा आहे. पारनेर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असता, मात्र समोरच्या व्यक्तीला मागे खेचण्यासाठी ही योजना रोखण्यात आली. कदाचित पाण्याचा प्रश्न माझ्याकडून सोडला जावा, हे माझ्या नशिबात असावे. मतांची कडकी झाल्यानंतर बहिण लाडकी झाली. यापूर्वी लाडकी बहिण कुठे होती? दुसरीकडे महागाई वाढवून महिलांच्या हातून दिलेले पैसे काढून घेण्यात आल्याचे टिकास्त्र लंके त्यांनी सोडले. आपला विजय निश्चित आहे फक्त मताधिक्क्य वाढवायचे आहे. आपले मत विकासाला मत दिले पहिजे. इतरांना मत देऊन, मत वाया जाऊ देऊ नका. प्रवाहाच्या दिशेने मतदान करा. जास्तीत जास्त निधी मिळविल्यानंतर मतदासंघाचा विकास होणार आहे. ज्या गावात जास्त लिड त्या गावाला बक्षिस आणि सर्वाधिक निधी देण्यात येणार असल्याचं राणी लंके म्हणाल्या आहेत.

प्राइम व्हिडिओने केली “वॉक गर्ल्स”च्या वर्ल्डवाइड प्रीमियरची घोषणा! ‘या’ तारखेला होणार जगभरात प्रिमियर

माजी खासदार डॉ. सुजय विखे हे सध्या करत असलेली वक्तव्ये पाहता राधाकृष्ण विखे यांनी सुजय दादांची शांती केली तर बरे होईल. त्यांनी नाशिक येथे नारायण नागबळीही करावा. ते दशक्रिया विधीला कावळयाच्या आगोदर येणार असे त्यांनी जाहिर केले होते. विखे यांचे सगळे पक्ष झाले आहेत. त्यांचा आता एकच पक्ष राहिलाय. तो म्हणजे पितृपक्ष आणि चिन्ह कावळा असे सांगत यशवंत गोसावी यांनी विखे यांच्यावर उपहासात्मक टीका केली.

शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के आरक्षण दिले त्यामुळे या व्यासपीठावर महिलांची संख्या लक्षणीय दिसते आहे. एकीकडे लाडकी बहिण योजनेतून पंधराशे रूपये दिले तर दुसरीकडे महागाई वाढवून हे पैसे काढून घेतले. आलिबाबा चाळीस चोर अशी या महायुती सरकारची अवस्था आहे. या राज्यातील अनेक उद्योग गुजरातला नेण्यात आल्याने बेरोजगारी वाढली आहे. राज्यात महिलांवर अत्याचार होत असल्याचं जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सिताराम काकडे म्हटले आहेत.

 

Exit mobile version