Download App

चहा विकणाऱ्यांना देश विकताना रेडहॅन्ड पकडलंय! कन्हैय्या कुमारचा पीएम मोंदींवर हल्लाबोल

Kanhaiya Kumar : चहा विकण्याच्या गोष्टी करणाऱ्यांना आम्ही देश विकताना रेडहॅन्ड पकडलं आहे. पाकिटमाराला जेव्हा पकडलं जातं तेव्हा सर्वात आधी तोच चोर चोर असं ओरडतं असा टोला कॉंग्रेस नेते कन्हैया कुमार Kanhaiya Kumarयांनी भाजप (BJP)आणि पंतप्रधान नेरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांना लगावला आहे. भाजप आणि पीएम मोदींची चोरी पकडल्यानंतर त्यांच्याकडून कॉंग्रेसनेच देशात भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्याकडून केला जातो, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्यांनी देश विकल्याचा आरोप यावेळी केला आहे.

दहशतवादी हाफिज सईदला आमच्याकडे सुपूर्द करा, भारताची पाकिस्तानकडे मागणी

नागपूरमध्ये कॉंग्रेसच्या 139 व्या वर्धापन दिनानिमित्त है तैयार हम या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. त्यावेळी कॉंग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका केली. यावेळी कॉंग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते देखील उपस्थित होते.

दहशतवादी हाफिज सईदला आमच्याकडे सुपूर्द करा, भारताची पाकिस्तानकडे मागणी

कॉंग्रेस नेत्यांच्या घरी इडीच्या धाडी टाकल्या जातात. दुसऱ्या दिवशी त्याच कॉंग्रेस नेत्यानं अमित शाहांबरोबर बोलून सेटींग केली तर लगेच इडी त्या कॉंग्रेस नेत्याच्या घराचा पत्ता विसरुन जाते, अशी घणाघाती टीका कन्हैया कुमार यांनी भाजप सरकारवर केली आहे. त्यामुळे भाजप नेत्यांकडून कॉंग्रेस नेत्यांना इडीचा धाक दाखवला जात असल्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाला जनतेच्या मनात बदनाम केलं आहे.

त्यामुळे जेव्हा कॉंग्रेस पक्षाला तु्म्ही बदनाम करता तेव्हा तुम्ही आपल्या पू्र्वजांना बदनाम करत असता. कारण कॉंग्रेस पक्षच आपल्या सर्वांचा इतिहास आहे. त्याचबरोबर सामान्य जनतेचं भविष्य असल्याचेही यावेळी कन्हैया कुमार यांनी सांगितले.

follow us