MLC Result : नागपूर पदवीधर निवडणूक रद्द करण्याची मागणी, उमेदवाराची याचिका, मतमोजणी अन् सुनावणीही आजच!

नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक रद्द करण्यात यावी, या मागणीची याचिका उमेदवार सचिन काळबांडे यांनी नागपूर खंडपीठात दाखल केलीयं.

Nagpur Vidhan Parishad

Nagpur Vidhan Parishad

Nagpur MLC Election : नागपूर पदवीधर मतदारसंघाची (Nagpur MLC Election ) निवडणूक रद्द करण्याची मागणी उमेदवार सचिन काळबांडे यांनी नागपूर खंडपीठात याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवर आजच सुनावणी पार पडणार आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी पार पडणार आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार असून सचिन काळबांडे यांनी मतदार यादीवरुन गंभीर आरोप करीत निवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे.

मुदत संपलेले पदार्थ पुन्हा ग्राहकांना दिले ? ब्लिंकिटला एफडीएचा मोठा दणका

23 ऑक्टोबर रोजी विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक घेण्यात आली. यामध्ये नागपूर, अमरावती, पुणे आणि औरंगाबाद या मतदारसंघांची निवडणूक प्रक्रिया पार पडलीयं. नागपूर पदवीधर मतदासंघातील उमेदवार सचिन काळबांडे यांनी निवडणूक प्रक्रियेवरुन गंभीर आरोप केले आहेत. निवडणुकीत मतदान प्रक्रियेची पारदर्शकता नष्ट झाली असल्याचा दावा करण्यात आला असून मतदार यादीच्या नियमाचंं उल्लंघन आणि मतदार यादीतील अशुद्धता, यामुळे निवडणूक रद्द करण्याची मागणीची याचिका दाखल करण्यात आलीयं. या याचिकेवर आज नागपूर खंडपीठात सुनावणी होणार आहे.

मतदार यादीची अंतिम घोषित होण्याचा कालावधी अंतिम वेळ असतो. 6 ऑक्टोबर ही अंतिम यादी घोषित करण्याची तारीख होती. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांकडून अंतिम यादी प्रकाशित न करताच निवडणूक घेण्यात आलीयं. तब्बल 98, 782 मतदार शेवटच्या चार दिवसांत आले होते, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.
त्यामुळे एवढ्या मतदारांना वंचित ठेवण्याचा हा कार्यक्रम निवडणूक अधिकाऱ्यांनी ठेवल्याचा आरोप काळबांडे यांनी केला आहे.

तसेच निवडणूक अधिकारी इंदुरकरांनीही याबाबत आपलं स्टेटमेंट दिले होते. अंतिम मतदार यादीसाठी आम्हाला अजूनही तीन दिवस लागतील. अंतिम यादीबाबत काही सांगता येत नाही. ही निवडणूक घाई गडबडीत करुन घेतली, त्यामुळे निवडणूक रद्द करावी, अशी मागणी सचिन काळबांडे यांनी केलीयं.

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात प्रमुख लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे मंगेश वानखेडे आणि शिक्षक भारतीचे अतुल देशमुख हेही निवडणूक रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नितेश कराळे यांनी अपक्ष तर सचिन काळबांडे यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केल्याने या लढतीत आणखी रंगत आली आहे.

दरम्यान, एकीकडे विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतमोजणी प्रक्रिया आज पार पडणार आहे. तर दुसरीकडे नागपूर खंडपीठात उमेदवार सचिन काळबांडे यांनी याचिका दाखल केलीयं. त्यामुळे इतर मतदारसंघ वगळता नागपूर पदवीधर मतदारसंघात नेमकं काय घडेल? याची उत्सुकता सर्वांनाच लागलीयं.

Exit mobile version