Download App

Nana Patole : फालतू भानगडीत पडण्यापेक्षा भाजपपासून सावध रहा; पटोलेंचा मुख्यमंत्री शिंदेंना सल्ला

Nana Patole on BJP : आगामी लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी विरोधकांनी एकत्र मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवार (दि. 23) पाटण्यात सर्वच विरोधी पक्षांची एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीसाठी राज्यातून उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विविध पक्षांने ज्येष्ठ नेते उपस्थित होते, विरोधकांच्या या बैठकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील टीका केली. त्यावरून ‘फालतू भानगडीत पडण्यापेक्षा भाजपपासून सावध रहा.’ असा सल्ला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री शिंदेंना दिला. (Nana Patole Advice to CM Eknath Shinde for save from BJP )

विरोधकांच्या बैठकीत चार बडे नेते भिडले; पवार-ठाकरे म्हणाले “आमच्याकडून काहीतरी शिका”

काय म्हणाले नाना पटोले?

नाना पटोले म्हणाले की, ‘भाजप विरोधात असलेले सर्व पक्ष आज पटण्यामध्ये एकत्रित आले आहेत, त्यामुळे भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पाटणा येथील बैठकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, मुख्यमंत्र्यांविषयी आता काय बोलावे, आठ दिवसापूर्वी ती एक नंबर वर असतात आठ दिवसानंतर दुसऱ्या नंबर वर जातात आणि एक नंबरवर मी पुन्हा येईन हे मुख्यमंत्री होतात. यांचे 50 पैकी केवळ 15 आमदार निवडून येतील असे सर्व्हे मधून येतं.

‘उगाच तोंडाच्या वाफा दवडू नका, ते तुमचंच भूत’; फडणवीसांवर राऊतांचा पलटवार

त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका करण्यापेक्षा मला असे वाटते की फार वाईट परिस्थिती आहे मुख्यमंत्र्यांनी भाजपपासून वाचून राहायला हवे. असल्या फालतू भानगडीत पडू नका. असा सल्ला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री शिंदेंना दिला.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील विरोधीपक्ष एकत्र येण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी आज देशातील विरोधीपक्षांची बैठक झाली. ही बैठक बिहारची राजधानी पाटणामध्ये झाली. या बैठकीला देशातील भाजपविरोधी 15 पक्ष उपस्थित राहिले. तर बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी या बैठकीचे आयोजन केले. या बैठकीला जेडीयू, आरजेडी. कॉंग्रेस, टीएमसी आणि आम आदमी पार्टी त्याचबरोबर राज्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित होते.

Tags

follow us