नागपूर : महाराष्ट्र काँग्रेस ( Congress ) अध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी भाजपवर ( BJP ) निशाणा साधला आहे. काँग्रेस पक्ष हा जनतेचा पक्ष आहे. तर भाजप हा काही मोजक्या उद्योगपतींचा पक्ष असल्याची टीका पटोलेंनी केली आहे. कसब्यामध्ये काँग्रेसने भाजपचा पराभव केला आहे. यावरुन देखील पटोलेंनी भाजपवर टीका केली आहे.
काँग्रेस पक्ष हा जनतेचा पक्ष आहे आणि काँग्रेस पक्षासोबत जनता आहे हे बीजेपी स्वतः सांगत असेल तर या वाक्याचा आम्ही स्वागत करतो, असे ते म्हणाले आहेत. बीजेपी हा मूठभर उद्योगपतींचा पक्ष आहे. एक लाख कोटी रुपयांचा कोळसा अदानीला फुकट देण्याचा काम पंतप्रधान करत असतील आणि दुसरीकडे महागाई बेरोजगारी वाढवत शेतकऱ्यांच्या समस्या वाढवत आहेत. कापूस सध्या शेतकऱ्यांच्या घरात आहे, कांदा घेतला जात नाही, धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, यावर सरकार लक्ष देत नाही, अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली नाही.
विदर्भात जास्तीत जास्त जागा पुढच्या काळात काँग्रेस जिंकेल- नाना पटोले
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. या स्थानिक पातळीवरच्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन त्या पद्धतीने निर्णय घेतला जातो. ज्या पक्षाला जास्त बहुमत असेल त्या पक्षाला झुकते माप त्या ठिकाणी दिलं जाते, असे पटोले म्हणाले आहेत. मात्र या निवडणुका होतील की नाही होतील याची चिंता आमच्या मनात आहे.
विरोधी पक्षात असताना ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात भीम गर्जना केली जात होती. मात्र आज आपण पाहतोय की जनगणना सुरू झाली मात्र जातीनिहाय जनगणना होत नाही. काँग्रेसने ओबीसी संदर्भातला प्रस्ताव पारित केला आहे अजूनही वेळ गेलेली नाही भाजपने आता हे जातीनिहाय जनगणना करावी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेतल्या जात नाही हा प्रश्न आहे. निवडणूक आयोग का शांत बसला आहे. अधिसूचना का काढत नाही, कोर्टाने सुद्धा सूचना केल्या आहे पण निवडणूक आयोग सुद्धा कुठे ना कुठे दबलेला आहे आणि भाजपला हरण्याची भीती आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या जात नाही, अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.