Nana Patole On MLA Cross Voting : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी राज्यात गेल्या महिन्यात निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत महाविकास आघाडीला (MVA) मोठा धक्का बसला होता. महाविकास आघाडीला फक्त 3 जागांवर विजय मिळाला होता तर महायुतीने (Mahayuti) 9 जागांवर विजय मिळवला होता.
काँग्रेसमधील (Congress) काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याने महायुतीच्या उमेदवारांना फायदा झाला होता त्यामुळे या आमदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस आमदार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडे करत होते. तर आता क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांना नाना पटोले यांनी इशारा दिला आहे.
काँग्रेसमध्ये कोणत्याही बदमाशाला स्थान नाही, चुकीला माफी नाही, असं आज माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले. त्यामुळे आता क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर काँग्रेस काय? कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
नेमकं काय म्हणाले नाना पटोले?
माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसच्या हायकमांडकडून निर्णय घेण्यात आला की, पक्षात आता कोणत्याही बदमाशांना स्थान दिलं जाणार नाही. काही लोक फक्त स्वतःच्या फायद्यासाठी आणि व्यापारासाठी पक्षात येतात. मात्र आता याबाबातची स्पष्ट भूमिका काँग्रेसकडून घेण्यात आली आहे. असं माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
जुलै महिन्यात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या व्हिपकडे दुर्लक्षकडून काँग्रेसच्या काही आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान केला असा आरोप करण्यात येत आहे. या आरोपांवरून काँग्रेसच्या हायकमांडने प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांकडून अहवाल मागवला होता. त्यामुळे आता काँग्रेस पक्षाशी दगाबाजी करणाऱ्या आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून तिकटी मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
Vinesh Phogat : विनेश फोगटने दिवस गाजवला, सेमी फायनलमध्ये धडक!
यावर आज माध्यमांशी नाना पटोले बोलताना म्हणाले की, पक्षाने कोणालाही अभय दिलेलं नाही. ज्याची कोणाची नाव यामध्ये आयडेंटिफाय झालेली आहेत, त्या कोणालाही अभय दिलेलं नाही, कारण चुकीला माफी नाही, अशी भूमिका काँग्रेस हायकमांडकडून घेण्यात आली आली असं यावेळी नाना पटोले म्हणाले.