Vinesh Phogat : विनेश फोगटने दिवस गाजवला, सेमी फायनलमध्ये धडक!

Vinesh Phogat :  विनेश फोगटने दिवस गाजवला, सेमी फायनलमध्ये धडक!

Vinesh Phogat : पॅरिस ऑलिम्पिकच्या (Paris Olympics) अकराव्या दिवशी महिला (50 किलो गटात) विनेश फोगटने (Vinesh Phogat) दमदार कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या ओक्साना लिवाचचा (Oksana Livach) 7-5 ने पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

या सामन्यात युक्रेनच्या ओसाना लिवाचविरुद्ध विनेशने दमदार सुरुवात करत पहिल्या राऊंडमध्ये दोन पॉइंट्स घेतले तर यानंतर दुसऱ्या फेरीत तिने बॅक टू बॅक पॉइंट्स घेतले. तर या सामन्याच्या शेवटच्या क्षणी विनेशने आणखी दोन पॉइंट्स प्राप्त करत हा सामना 7-5 ने असा जिंकला.  उपांत्य फेरीत विनेश फोगटचा क्युबाच्या युस्नेलिस लोपेझशी होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना आज रात्री 10.15 वाजता होणार आहे. युस्नेलिस लोपेझ विद्यमान पॅन अमेरिकन गेम्स चॅम्पियन आहे.

तर दुसरीकडे महिला (50 किलो गटात) उपांत्यपूर्व फेरीत विनेश फोगटने दमदार कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन (Tokyo Olympic 2020) यु सुझुकीचा (Yui Susuki) पराभव केला आहे. या सामन्याच्या पहिल्या राऊंडमध्ये युई सुझुकीने टेक्निकल काउंटच्या मदतीने आघाडी घेतली होती.

पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ, जिल्हाधिकारी सुहास दिवसे ‘त्या’ प्रकरणात दाखल करणार अब्रुनुकसानीचा दावा

मात्र या सामन्याच्या शेवटच्या 15 सेकंदात विनेशने शानदार कामगिरी करत सामना आपल्याकडे वळवला आणि 3-2 अशी आघाडी घेतली मात्र या आघाडीला जपानकडून आव्हान देण्यात आले मात्र शेवटी निर्णय भारताच्या बाजूने आला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube