Download App

‘हे आम्ही सहन करणार नाही’, राहुल गांधींवरील वक्तव्यानंतर पटोलेंचा राऊतांवर हल्लाबोल

  • Written By: Last Updated:

Nana Patole On sanjay Raut : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना दुसरीकडे त्याचा परिणाम इतर घडामोडींवरही दिसून येत आहे. शरद पवार यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर नवा अध्यक्ष कोण होणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. सध्या राष्ट्रवादीचा पुढचा बॉस कोण याची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी दिलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चांगलेच संतापले.

शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने हे सर्व सुरू झाले. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी राष्ट्रवादीची तुलना थेट काँग्रेसशी केली. संजय राऊत म्हणाले, “मल्लिकार्जुन खरगे हे देखील काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. पण त्यांचा पक्ष सोनिया गांधीं चालवत आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीचा जो कोणी अध्यक्ष होईल, ते शरद पवारच पक्षाचे नेते राहतील, त्यांनी राजकारणातून संन्यास घेतलेला नाही, या संदर्भात नाना पटोले यांनी राऊत यांच्यावर टीका केली.

नाना पटोले म्हणाले?

नाना पटोले म्हणाले, “संजय राऊत हे आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाहीत, असे आम्ही वारंवार सांगितले आहे. उद्या निर्णय उद्धव ठाकरेनाहीतर संजय राऊत घेतील, असे तुम्ही म्हणाल का? खर्गे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना प्रवक्तेपदाचा मोठा अनुभव आहे. संजय राऊत जर तुम्ही अशा व्यक्तीचा अपमान करत असाल तर आम्ही ते सहन करणार नाही.

अंतिम निर्णय बाकी, पण माझ्याकडून… शरद पवारांच्या राजीनाम्यावर ठाकरे बोलले

संजय राऊतांनी दिले प्रत्युत्तर

दरम्यान, याबाबत माध्यम प्रतिनिधींनी संजय राऊत यांना विचारणा केली असता त्यांनी उपरोधिक उत्तर दिले. संजय राऊत म्हणाले  त्यांचा पक्ष त्यांना गांभीर्याने घेत नाही. याबाबत मी राहुल गांधींशी चर्चा करणार आहे. त्यांच्यापेक्षा राहुल गांधी माझ्याशी जास्त बोलतात.”

Tags

follow us