Download App

केद्रातील भाजपच्या हुकूमशाही कारभाराची शिंदे सरकारला लागण; पटोलेंचा घणाघात

  • Written By: Last Updated:

Nana Patole On shinde-fadanvis : मंत्रालयात (ministry) वारंवार होणारे आत्महत्येचे प्रयत्न आणि लाचखोरी या दोन्ही गोष्टी रोखण्यासाठी राज्य सरकारने (State Govt) एक उपाय शोधला आहे. आता मंत्रालयात जाण्यासाठी सरकारकडून नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. या नियमांनुसार, जर तुम्हाला मंत्रालयात प्रवेश करायचा असेल तर पास लागेल. या पासशिवाय तुम्ही प्रवेश करू शकणार नाही. दरम्यान, यावरून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) सरकारवर टीका केली. केद्रातील भाजपच्या (BJP) हुकूमशाही कारभाराची लागणी शिंदे सरकारला झालीये, असा घणाघात त्यांनी केला.

ते म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारच्या हुकूमशाही कारभाराची लागण राज्यातील शिंदे सरकारला झाली आहे. केंद्र सरकार मूठभर लोकांसाठी काम करते तसंच राज्य सरकारही काम करत आहे. सरकार मुठभर लोकांसाठी नाही तर सामान्य जनतेची काम करण्यासाठी आहे. आपले काम स्थानिक पातळीवर होत नसल्याने लोक मंत्रालयात येतात. मंत्रालयात दलालांना मुक्त वावर आहे, आणि सुरक्षेचे कारण सांगून सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेश नाकारला जात आहे, असा घणाघात पटोलेंनी केला.

विश्लेषण : कचऱ्यातून पैसा! भारताच्या इकॉनॉमीला बूस्टर देणारं Waste Economy नेमकं काय?

नाना पटोले म्हणाले की, हुकूमशाही व्यवस्थेची सुरुवात गुजरातमध्ये झाली, 2014 पासून तीच व्यवस्था केंद्रात आली आणि आता तीच हुकूमशाही व्यवस्था महाराष्ट्रात आली आहे. मंत्रालयात दररोज हजारो लोक आपल्या कामासाठी येतात, स्थानिक प्रशासनाला वारंवार विनंती करूनही त्यांची कामे होत नाहीत. नुसती आश्वासने देऊन मंत्री मोकळे होतात. पण कृती काही होत नाही. त्यामुळे लोक मंत्रालयात येतात. काही जण आत्महत्येचा प्रयत्नही करतात. कोणीही आत्महत्या करू नये, अशीच आमची भूमिका आहे. पण लोक जीव देण्यापर्यंत का जातात? याचा विचार सरकारने करायला हवा, असंही पटोले म्हणाले.

शासन आपल्या दारी म्हणत कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी व केवळ जाहिरातबाजी केली जात आहे. प्रत्यक्षात या कार्यक्रमातून काहीही साध्य होत नाही, म्हणूनच तर लोक मंत्रालयात येतात. काम होत नसल्यामुळंच ते आत्महत्या करण्यापर्यंत टोकाचे पाऊल उचलतात, सर्वसामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश मर्यादित करणं त्यासाठी जाचक अटी घालणं ही हुकुमशाहीप्रवृत्ती आहे. हे जाचक नियम लागू न करता सर्वसामान्यांना मंत्रालयातील प्रवेश सुलभ करण्यावर सरकारने भर द्यावा. मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी मोठ्या रांगा लागतात, त्यांच्यासाठी कोणत्याही सोयी नाहीत. जनती ही राजा आहे, त्यांचा सन्मान झाला पाहिजे, असं पटोले म्हणाले.

सरकार हे जनतेसाठी आहे, मंत्र्यांनी प्रशासनाच्या मदतीने ते चालवणे अपेक्षित आहे. असं असतांना केवळ सुरक्षेच्या मुद्दावरून आणि गर्दी कमी करण्यासाठी प्रवेश नाकारणे संतापजनक असल्याचे ते म्हणाले.

Tags

follow us