Nana Patole : अजित पवारांनी नेमका डोळा कुणाला मारला?; नाना पटोलेंनी दिलं उत्तर

Nana Patole Reaction On Ajit Pawar Winky Action :  काही दिवसांपूर्वी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधीमंडळ परिसराच्या आवारात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बोलत असताना डोळा मारल्याचा व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओची बरीच चर्चादेखील झाली होती. एवढेच काय तर, यातून अनेक अर्थदेखील काढण्यात आले होते. मात्र, आता अजितदादांच्या या कृतीवर […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (10)

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (10)

Nana Patole Reaction On Ajit Pawar Winky Action :  काही दिवसांपूर्वी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधीमंडळ परिसराच्या आवारात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बोलत असताना डोळा मारल्याचा व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओची बरीच चर्चादेखील झाली होती. एवढेच काय तर, यातून अनेक अर्थदेखील काढण्यात आले होते. मात्र, आता अजितदादांच्या या कृतीवर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते एबीपी माझाच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर रोखठोक मते व्यक्त केली.

अमेरिकेचा चीनला मोठा धक्का; अरुणाचल प्रदेश भारताचाच…

अजित पवारांनी नेमका डोळा कुणाला मारला हे मी कसं सांगू शकतो असे म्हणत ते म्हणाले की, ते दादा आहेत. त्यांनी डोळा कुणाला मारला हे त्यांनाच विचारावं लागेल. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी त्यांनी नेमका डोळा कुणाला मारला याबद्दल सांगता आलं असतं. त्यामुळे त्यांनी डोळा कुणाकडे बघून मारला त्याचा अर्थ काय हे अजित पवारचं सांगू शकतील अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली आहे.

Delhi Capitals New Captain : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरकडे दिल्ली कॅपिटल्सची धुरा

तांबे वादात भाजपकडून आग लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पटोलेंनी यावेळी केला. देश वाचला पाहिजे लोकशाही वाचली पाहिजे असे म्हणत लोकसभेच्या जागा वाटपांचा निर्णय हायकमांड घेईल असे ते म्हणाले. सध्या राज्यात ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यावरून जनतेमध्ये रोष आहे. भाजप अमरपट्टा घेऊन आल्याच्या आविर्भावात वागतयं मात्र, वाजपेयी, इंदिराजी यांनाही जनतेनं पराभव दाखवला आहे. लोकशाहीत काहीही होऊ शकते.

आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राज्यात जुनी पेन्शन योजना लागू व्हावी हीच भूमिका आहे. मुठभर लोकांचं कर्ज माफ करण्यासाठी भाजपकडे पैसा आहे. मात्र, गरिबांसाठी सरकारकडे पैसा नसल्याची टीका पटोलेंनी यावेळी केली.

 

Exit mobile version