Nana Patole : तुमचे नेतृत्व कमकुवत होते का? , पटोलेंचा राऊतांवर पलटवार

काँग्रेस ( Congress )  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole )  यांच्यावर सध्या चहुबाजुंनी टीका होते आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी ( Sanjay Raut )  देखील त्यांना लक्ष केले आहे. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर ठाकरे सरकार पडले नसते, असे म्हणत त्यांनी नाना पटोलेंना लक्ष केले आहे. यावरुन नाना […]

Untitled Design (15)

Untitled Design (15)

काँग्रेस ( Congress )  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole )  यांच्यावर सध्या चहुबाजुंनी टीका होते आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी ( Sanjay Raut )  देखील त्यांना लक्ष केले आहे. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर ठाकरे सरकार पडले नसते, असे म्हणत त्यांनी नाना पटोलेंना लक्ष केले आहे. यावरुन नाना पटोलेंनी थेट शिवसेना नेतृत्वावरच निशाणा साधला आहे. मी राजीनामा दिला नसता तर सरकार पडले नसते असे म्हणता, याचा अर्थ तुमचे नेतृत्व कमकुवत होते का?, असा प्रश्न विचारत त्यांनी थेट उद्धव ठाकरेंनाच लक्ष केले आहे.

मी राजीनामा दिला नसता तर सरकार पडले नसते. मी राजीनामा दिला नसता तर खोके सरकार आले नसते, असे राऊत म्हणाले याचा अर्थ ते माझ्या शक्तीचा परिचय करुन देत आहे. त्यांना माझ्या शक्तीचा अंदाज आहे, असे म्हणत पटोलेंनी राऊतांना टोला लगावला. तसेच राऊतांचा पक्ष कमकुवत होता का?, राऊतांचे पक्ष नेतृत्व कमी पडत होते असे राऊतांना म्हणायचे आहे का?, असे म्हणत पटोलेंनी राऊतांना लक्ष केले आहे.

तसेच राऊतांनी राज्यातील महागाई, बेरोजगारी, या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, माझ्यावर बोलल्याने हे प्रश्न सुटणार नाहीत, असा सल्ला देखील त्यांनी राऊतांना दिला. दरम्यान मला विधानसभा अध्यक्ष बनवण्याचा निर्णय हा काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतला होता. तसेच मला प्रदेशाध्यक्ष बनवण्याचा निर्णय देखील सोनिया गांधींनीच घेतला होता. माझ्या राजीनाम्यावर बोलणे म्हणजे हायकमांडवर प्रश्न उपस्थित केल्यासारखे आहे, असे पटोले म्हणाले.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात विरुद्ध नाना पटोले असा संघर्ष दिसत आहे. थोरात यांनी आपला विधीमंडळ गटनेते पदाचा राजीनामा देखील काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे दिला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रभारी एच. के पाटील हे उद्या मुंबईत येणार आहेत.

Exit mobile version