भाजपला ‘हात’ दाखविणारे भिवंडीचे महापौर नारायण चौधरी आहेत तरी कोण ?

Narayan Chaudhary: भिवंडीमध्ये भाजपचा बंडखोर उमेदवार नारायण चौधरी हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पाठिंब्यावर महापौरपदावर विराजमान झाले आहे.

Naryan Chudhari Bhiwandi Mayor

Naryan Chudhari Bhiwandi Mayor

Bhiwandi Mayor : चंद्रपूर आणि भिवंडी महानगरपालिकेची महापौर निवड (Bhiwandi Mayor) राज्यात सर्वाधिक गाजली. चंद्रपूरमध्ये बहुमत नसतानाही उद्धव ठाकरे सेनेच्या पाठिंब्यावर भाजपचा (BJP) महापौर झाला. तर भिवंडीमध्ये भाजपचा बंडखोर उमेदवार नारायण चौधरी (Narayan Chaudhary ) हे काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) पाठिंब्यावर महापौरपदावर विराजमान झाले आहे. चौधरी हे महापौरपदासाठी सेक्युलर फ्रंटचे पुरस्कार उमेदवार होते. भाजपला धक्का देऊन महापौरपदावर बसणारे नारायण चौधरी कोण आहेत ? हे जाणून घेऊया…


काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर चौधरी महापौर, भाजपचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर

90 जागा असलेल्या भिवंडी महानगरपालिकेत एकाही पक्षाला बहुमत नव्हते. 30 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष होता. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा बारा जागा मिळाल्या होत्या. तर भाजपने 22 जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेने 12 जागा जिंकल्या होत्या. इतर जागा कोणार्क विकास आघाडी, भिवंडी विकास आघाडी, समाजवादी पक्ष व अपक्षाकडे सत्तेच्या चाव्या होत्या. भाजपने आपला महापौर बसविण्यासाठी फिल्डिंग लावली होती. काही राजकीय समीकरणं जुळविली होती. भाजपकडून निवडून आलेले नारायण चौधरी हे पहिल्यांदा महापौरपदाचे उमेदवार होते. पण एेनवेळी भाजपने उमेदवार बदलविला स्नेहा पाटील यांना महापौरपदाची उमेदवारी दिली. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीने चौधरी यांना पाठिंबा दिला. चौधरी यांनी भाजपचे सहा नगरसेवक फोडले. त्यामुळे 48 मते घेत चौधरी हे महापौर झाले. भाजपच्या उमेदवार स्नेहा पाटील यांना अवघे 16 मते मिळाली. तर तिसरे उमेदवार विलास पाटील यांना 25 मते मिळाली. त्यांना शिवसेनेचे बारा, कोणार्क विकास आघाडीचे चार, समाजवादी सहा आणि भिवंडी विकास आघाडीचे तीन नगरसेवकांचा पाठिंबा होता.


कर आणि जीएसटी चुकवण्यासाठी बिलिंग सिस्टमचा गैरवापर? 2019 पासून 70 हजार कोटींचा घोटाळा


किंगमेकर नारायण चौधरी आहेत तरी कोण ?

नारायण चौधरी हे 24 वर्षांपासून भिवंडी महानगरपालिकेत नगरसेवक आहेत. ते अनेक पक्षांकडून नगरसेवक झालेले आहे. 2002 पासून ते राजकारणात आहेत. 2002 मध्ये ते भिवंडी विकास आघाडीकडून नगरसेवक झाले. त्यानंतर 2007 आणि 2012 मध्ये ते अपक्ष म्हणून निवडून आले. तर 2012 मध्ये ते समाजवादी पक्षात गेले. तेव्हा त्यांची पत्नी अलका चौधरी या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्यानंतर 2017 मध्ये नारायण चौधरी हे शिवसेनेत दाखल झाले. निवडणुकीपूर्वी एक वर्ष आधी ते भाजपमध्ये दाखल नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. भाजपने महापौरपद दिले नाही. त्यामुळे त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) बरोबर जावून ते भिवंडीचे पहिल्यांदा महापौर झाले.


बीडच्या आष्टीत दोघांकडं आढळले इंग्लिश बनावटीचे पिस्तूल, पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या


दूध व्यावसायिक ते महापौर

नारायण चौधरी हे शेतकरी आहेत. त्यांनी सुरुवातीला दूधाचा व्यवसाय केला. त्यानंतर बांधकाम व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकले. त्यानंतर राजकारणात आले. ते भिवंडीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची नारायण डेव्हलपर्स नावाने बांधकाम कंपनी आहे.

Exit mobile version