Narayan Rane Agressive on Anil Parab for his Statement : अनिल परब आणि आक्रमकता हे समीकरण तरी जुळतं का? त्यांचा जीव केवढा? असं म्हणत नारायण राणे यांनी अनिल परब यांना चांगलंच फैलावर घेतल्याचं पाहायला मिळालं. केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत दिशा सालियन प्रकरणासह इतर अनेक मुद्द्यांवर आपली प्रतिक्रया दिली. त्यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची देखील खिल्ली उडवल्याचं पाहायला मिळालं.
काय म्हणाले नारायण राणे?
यावेळी अनिल परब यांच्या विधानावरून नारायण राणेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी टोला लगावत म्हटलं की, अनिल परब आणि आक्रमकता हे समीकरण तरी जुळतं का? त्यांचा जीव केवढा? अनिल परब यांनी आक्रमकता दाखवावीच कोणताही बाबतीत. आतापर्यंत त्यांनी कुणाच्या कानफाटात मारली हे देखील ऐकिवात नाही. तो भाषण करू शकतो, तो वकील आहे. खोटं नाटक करणं त्याचा तो पेशाच आहे. त्यामुळे त्याने उगाच बढाया मारू नये. जे काही करायचं ते कर पण तोंड बंद कर. असं म्हणत राणे यांनी परब यांना त्यांच्या विधानावरून चांगलंच फैलावर घेतलं.
नागपूर दंगलीतील नुकसानीची वसुली होत नाही; कारण देत जरांगेंनी फडणवीसांना आठवून दिला जुना शब्द
तर उद्धव ठाकरेंबाबत बोलताना राणे म्हणाले की, दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे यांच नाव घेऊ नका अशी विनंती करणारा दुसरा कॉल आला होता. दुसरा फोन कोरोनाच्या काळात आला होता. त्यावेळी आपल्या हॉस्पिटलची परवानगी राज्य सरकारकडे होती. त्या संबंधित ती परवानगी मिळेल असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी आदित्यचं नाव घेऊ नका अशी पुन्हा एकदा त्यांनी विनंती केली. तुम्ही जरा या प्रकरणात सहकार्य करा असंही ते आपल्याला म्हणाल्याचं राणे यांनी यावेळी सांगितलं.