Download App

Narayan Rane : विरोधकांकडे बोंबलाय शिवाय काही नाही, राणेंचा मविआला टोला

Narayan Rane On MVA : देशाचे केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. यावेळी ते मुंबई येथे माध्यमांशी बोलत होते. आज मुंबई येथे पंतप्रधान मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी त्यांच्यासोबत शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर हे देखील उपस्थित होते.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये रोजगारासाठी एक योजना तयार केली आहे. त्यातून आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नोक-या देण्याचे काम करतोय. पण विरोधकांनी त्याला विरोध करण्याशिवाय काही काम नाही. कारण विरोधकांच्या हातात फक्त बोंबलायचे काम शिल्लक राहिलेले आहे. अशी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यतमातून 71 हजार तरुणांना नियुक्ती पत्र दिले. रोजगार मेळाव्या अंतर्गत सरकारी विभागात नुकत्याचं नियुक्त झालेल्या तरुणांना हे नियुक्ती पत्र दिले गेले. दरम्यान त्यांच्या या रोजगार मेळाव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

‘आदित्य ठाकरे यांचे मानसिक संतुलन बिघडले’

मोदींवर टीका करतांना राऊत म्हणाले होते की, महाराष्ट्रात नगरसेवक आणि शाखाप्रमुखांच्या स्थरावर रोजगार मेळावे आयोजित केले जात असतात. आणि त्यांना नियुक्तीपत्र वाटण्याचं काम देखील हे नगरसेवक आणि शाखाप्रमुखाद्वारे केलं जायचं. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापनाच ही भूमीपुत्रांना रोजगार मिळवून देण्यासाठी केली होती. मात्र, त्यांनी कधी अशी पत्रक वाटली नाहीत, पंतप्रधान मोदी हे नियुक्तीपत्र वाटून राजकारण करत आहेत, असं राऊत म्हणाले होते. राऊतांच्या याच टीकेला राणेंनी पलटवार केला. एखादी नोकरी संजय राऊतांना द्या, अशी खिल्ली राणेंनी उडविली.

Tags

follow us

वेब स्टोरीज