राऊतांचा वेडसरपणा नीट करायचा उपाय आमच्याकडं; नारायण राणेंचा थेट इशारा

Narayan Rane On Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) केंद्रीय मंत्री अमित शाहांची (Amit Shah)भेट घेतली, त्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली, त्यावर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, संजय राऊत […]

Sanjay Raut and Narayan Rane

Sanjay Raut and Narayan Rane

Narayan Rane On Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) केंद्रीय मंत्री अमित शाहांची (Amit Shah)भेट घेतली, त्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली, त्यावर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, संजय राऊत यांचं डोकं ठिकाणावर नाही. त्याची मानसिकता संपलेली आहे. कधी कुठे काय बोलावं हे त्याला कळत नाही, त्यांचा वेडसरपणा नीट करायची उपाययोजना आमच्याकडं आहे, अशा शब्दात नारायण राणे यांनी खासदार संजय राऊत यांना थेट इशाराच दिला आहे.

Esha Gupta हिने बिकिनीमध्ये फ्लाँट केले कर्वी फिगर, अभिनेत्रीचा बोल्ड लूक पाहून वाढला पारा

नारायण राणे म्हणाले की, अमित शाहा केंद्रीय मंत्री असले तरी ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. आणि देवेंद्र फडणवीस हे देखील महाराष्ट्राचे भाजपचे नेते आहेत. तर त्यांनी आपल्या नेत्याला भेटणं म्हणजे मक्का मदीनाला गेलं असं कोणी म्हणेल का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

ठरलं!…NCP चा शिरुर लोकसभा 2024 चा उमेदवार अमोल कोल्हेचं….शरद पवार

राणे म्हणाले की, संजय राऊत काहीही बोलतो, त्यामुळे काही मीडियाचे लोकं संजय राऊतांना प्रसिद्धी देत आहेत. त्याचाही विचार करायला हवा, नाहीतर संजय राऊत बाजूला राहील आणि त्याच्यातून वेगळंच काहीतरी निष्पन्न होईल,असा थेट इशाराच नारायण राणेंनी माध्यमांना दिला आहे. त्याचा वेडसरपणा नीट करण्यासाठी आमच्याकडे उपाययोजना आहेत. त्या आम्ही अंमलात आणूच असेही यावेळी राणे यांनी सांगितले. मीडियाने काय दाखवावं आणि काय दाखवू नये याच्यावर संयम बाळगावा,असं मला वाटतं, असंही राणे म्हणाले.

नारायण राणे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाली. त्यामध्ये उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर राहावा यासाठी, महाराष्ट्राने सुक्ष्म व लघुउद्योग विविध रोजगार उद्योग राबवावेत. रोजगार निर्मितीसाठी विविध उद्योग, तरुण तरुणींना उद्योग करण्याला प्रवृत्त करणे, रोजगार वाढवणे, उत्पादन वाढवणे, जीडीपी वाढवणे आणि आत्मनिर्भर भारत बणवण्यासाठी हा उपक्रम वाढवण्यासाठी आजची बैठक झाल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले. आजची बैठक ही महाराष्ट्रासाठी आणि तरुण-तरुणींसाठी महत्वाची ठरल्याचेही राणे यांनी सांगितले.

Exit mobile version