ठरलं!…NCP चा शिरुर लोकसभा 2024 चा उमेदवार अमोल कोल्हेचं….शरद पवार

ठरलं!…NCP चा शिरुर लोकसभा 2024 चा उमेदवार अमोल कोल्हेचं….शरद पवार

NCP Leader Amol Kolhe :  शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा कोण उमेदवार असणार याबाबत अनेक चर्चा करण्यात येत होत्या. यानंतर डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव पुणे लोकसभा जागेसाठी फायनल करण्यात आले आहे. त्यामुळे कोल्हे यांना निवडणुकीच्या तयारीसाठी वर्षभर वेळ मिळणार आहे. शरद पवार यांनी कोल्हेंच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आज पुण्यात बैठक घेतली. शिरुरसह, जालना आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. निसर्ग मंगल कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, सुनील तटकरे आदी नेते या बैठकीला उपस्थित होते.

Video : गुजरात दंगल : मोदी टार्गेटवर कसे आले?

शिरुर लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार विलास लांडे यांनी लोकसभा निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर आता अमोल कोल्हे यांचे नाव पुन्हा एकदा या जागेसाठी निश्चित करण्यात आले आहे. अमोल कोल्हे यांनी 2019 साली शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभूत केले होते. त्यानंतर आता पुन्हा कोल्हे यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे.

भुजबळांनी सांगितला अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचा फॉर्म्युला; म्हणाले प्रत्येक…

यानंतर अमोल कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. कोल्हे म्हणाले की, मी कला क्षेत्रात कार्यरत असल्याने थोडासा जनसंपर्क कमी झालेला होता यापूर्वी ज्या प्रकल्पांसाठी मी शब्द दिला होता त्या पूर्ण करणे देखील माझ्यासाठी महत्त्वाचे होते पण गेल्या चार वर्षात बैलगाडा शर्यत, पुणे नाशिक महामार्ग या दोन प्रमुख विषयांवर मी निवडणूक लढवली होती, हे दोन्ही विषय पूर्ण झालेले आहेत आगामी काळात देखील शिरूर मतदार संघात अनेक मोठ्या महामार्गांचे काम होणार आहे, असे ते म्हणाले.

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube