भुजबळांनी सांगितला अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचा फॉर्म्युला; म्हणाले प्रत्येक…
Chhagan Bhujbal On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. आता राष्ट्रवादीचा वर्धापन दिन नगरमध्ये साजरा करत आहोत. राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यक्रम झाले पाहिजे, हा त्यामागील उद्देश आहे, असे ते म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरुन सरकारवर निशाणा साधला. तुम्ही आत्तापर्यंत काय करत होते, असे ते सरकारल म्हणाले.
ओबीसींसाठी छगन भुजबळ आणि ओबीसी समाजाचे लोक लढतो आहोत, आरक्षण संपू नये म्हणून झगड आहोत. मराठा आणि दलीत विद्यार्थांना 60 हजार रुपये शिक्षणासाठी मिळतात. तसेच आमच्या ओबीसी विद्यार्थांना देखील पैसे दिले पाहिजे ही आमची मागणी होती. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली, मात्र 5 महिने झाले तरी अद्याप अंमलबजावणी नाही, असे भुजबळ म्हणाले.
https://letsupp.com/maharashtra/western-maharashtra/youth-riot-by-taking-photo-of-aurangzeb-in-the-procession-54182.html
यावेळी त्यांनी अजितदादांच्या भावी मुख्यमंत्री होण्यावरदेखील भाष्य केले. काल नरहरी झिरवळ एके ठिकाणी बोलताना अजितदादांना मुख्यमंत्री करायचे आहे, असे ते म्हणाले. यावर आता त्यांनी भाष्य केले. प्रत्येक पक्षाला वाटते आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे. हे पूर्ण करायचे असेल तर महाविकास आघाडीमध्ये राहून सर्वात जास्त जागा आम्हाला निवडून आणता आल्या पाहिजे, तरच राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी संजय राऊत व अजित पवार यांच्याविषयावर देखील भाष्य केले. आता काय सल्ला देण्याचा विषय राहिला नाही. तारतम्य ठेवून बोलले पाहिजे, लोकशाही मध्ये जे तत्व आहेत ते पाळले गेले पाहिजे. बाकी संजय राऊत आणि अजित पवार विषय आता मिटले आहे, असे म्हणत त्यांनी या वादावर पडता टाकला.