Narayan Rane : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डी. एड बेरोजगारांच्या प्रश्नावर लवकरच भेटून त्यांच्या कानावर या गोष्टी घालणार आहे. तसेच यामधून निश्चितपणे योग्य मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन नारायण राणे यांनी दिल्यानंतर तब्बल १४ दिवस सुरू असलेले हे डी. एड बेरोजगारांचे उपोषण रात्री उशिरा मागे घेण्यात आले आहे.
मात्र, यादरम्यान आंदोलकांपैकी एकाने शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या संदर्भात केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना माहिती दिली. त्यावर मंत्री राणे चांगलेच भडकले आणि सर्वांसमोरच म्हणाले ‘कोण शिक्षणमंत्री?’
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मध्यस्थीनंतर अखेर डी.एड बेरोजगारांनी आपले बेमुदत उपोषण मागे घेतले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज संध्याकाळी उशिरा ओरोस येथील डी.एड बेरोजगारांच्या उपोषणास भेट दिली. गंल्या १४ दिवसांपासून या डी.एड बेरोजगारांनी विविध प्रश्नासाठी सिंदुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे उपोषण सुरु केले होते.
नारायण राणे म्हणाले की, तुमचे प्रश्न महत्वाचे आहेत. मी उद्या मुंबईत गेल्यानंतर जे भेटतील ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. राज्यातील डी. एड बेरोजगारांचे प्रश्न त्यांच्या समोर मांडणार आहे. तसेच योग्य मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
सिंदुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे डी. एड बेरोजगारांनी उपोषण सुरु केले होते. मात्र, त्यांची कोणीही दखल घेत नव्हते. रविवारी सिंदुदुर्गच्या दौऱ्यावर आले असता केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी रात्री उशिरा उपोषणस्थळी भेट दिली. तसेच तब्बल १४ दिवस सुरू असलेले हे डी. एड बेरोजगारांचे उपोषण रात्री उशिरा मागे घेण्यात आले आहे. याप्रसंगी एकाने शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या संदर्भात केंद्रीयमंत्री राणे यांना माहिती दिली. त्यावर मंत्री राणे चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले.