Narayan Rane on Uddhav Thackeray and ShivSena : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी खाली जातीय असे बोलले जाते तेव्हा भाजपकडून संजय राऊत आणि काही नेत्यांकडे बोट दाखवले जाते. त्याचवेळी विरोधी पक्षांकडून नितेश राणे आणि निलेश राणे यांच्याकडे बोट दाखवले जाते. राजकारणाची पातळी सावरायची म्हटलं तर त्यांना गप्प करा असं म्हटलं जातं.
त्यावर नारायण राणे म्हणाले नितेश आणि निलेश यांच्याबद्दल संजय राऊत आणि त्यांचे मंडळी तक्रार करत असतील तर मला वाटतं की ते दोघे योग्य काम करतात. विरोधक दखल घेतात म्हणजे आपली मुलं चांगली काम करतात. ते काही दारु पिऊन बोलत नाहीत किंवा व्यसन करत नाहीत. ते अज्ञानाने काही बोलत नाहीत दोघेही उच्च शिक्षित आहेत. अभ्यास करुन बोलतात. त्यांच वय आहे, राणेंच रक्त आहे त्यामुळे ते बोलणारचं. त्यामध्ये काही चुकीचे नाही, असं नारायण राणे यांनी सांगितले.
मोठी बातमी! काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांच्या हत्येचा कट…
नितेश राणे यांच्या बोलण्याबद्दल आणि निलेश राणे यांच्या ट्विटबद्दल आक्षेप घेतला जातो त्याबद्दल त्यांनी काही सल्ला देतात का? यावर नारायण राणे म्हणाले की मी याबद्दल काही सांगत नाही. त्यांचे ते वैशिष्टे आहेत. त्यानुसार बोलत असतात. त्यांना जे काही दिसतं, त्यांचा राजकारणाबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दलचा दृष्टीकोन, एखाद्या व्यक्तीबद्दल त्यांना चीड असेल, सारखं तेच तेच विचित्रसारखं बोलतोय, त्यामुळे ते चीड व्यक्त करतात. त्यांना त्यांचे राजकारण करुन देतो. काही सल्ले द्यायचे असतील तर देत असतो. हा विषय घेऊ नको, हा विषय घे, असे नारायण राणे यांनी सांगितले.