मोठी बातमी! काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांच्या हत्येचा कट…

मोठी बातमी! काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांच्या हत्येचा कट…

Congress Leader Mallikarjun Kharge : भाजप आणि काँग्रेसमध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीका – टिप्पणी सुरु आहे. यातच काँग्रेसने भाजप आमदारावर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. दरम्यान आता यामुद्द्यावर भाजपकडून देखील स्पष्टीकरण आले आहे, ज्यामध्ये धमकीचा ऑडिओ खोटा असल्याचे म्हटले आहे. निवडणुकीच्या काळात या आरोप – प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

काँग्रेसच्या आरोपावर भाजपचे स्पष्टीकरण
भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार मणिकांत राठोड म्हणाले, हे आरोप ऐकून मला खूप आश्चर्य वाटले. काँग्रेस पक्षाला निवडणूक हरण्याची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांकडून असे खोटे आरोप केले जात आहेत. मी काँग्रेसविरोधात तक्रार दाखल केली आहे. ते म्हणाले, “काँग्रेसने सोशल मीडियावर प्रसारित केलेले ऑडिओ खोटे असून, मी कोणालाही धमकी दिलेली नाही. असे स्पष्टीकरण राठोड यांनी दिले आहे.

काँग्रेसचा आरोप नेमका काय? जाणून घ्या
बेंगळुरू येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये काँग्रेसने एक ऑडिओ क्लिप वाजवली, ज्यामध्ये चित्तापूरचे भाजपचे उमेदवार मणिकांत राठोड यांनी खर्गे यांच्यासाठी अपमानास्पद भाषा वापरली. तसेच राठोड यांनी खर्गे यांना आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्याबद्दल बोलले असल्याचा दावा काँग्रेसकडून केला जातो आहे.

पत्रकार परिषदेत रणदीप सुरजेवाला म्हणाले, भाजप नेते आता मल्लिकार्जुन खर्गे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हत्येचा कट रचत आहेत. चित्तापूरमधील भाजप उमेदवाराच्या रेकॉर्डिंगवरून हे स्पष्ट होत आहेत. परंतु मला माहित आहे की पंतप्रधान, कर्नाटक पोलीस आणि भारताचा निवडणूक आयोग देखील या प्रकरणावर भाष्य करणार नाही. पण कर्नाटकची जनता गप्प बसणार नाही आणि निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून त्यांना चोख प्रत्युत्तर देईल.

तुम्ही फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घ्या; भुजबळांनी राज ठाकरेंना फटकारले !

भाजप उमेदवाराला अटक व सुटका
दरम्यान 13 नोव्हेंबर 2022 रोजी चित्तापूरमधील काँग्रेस उमेदवार प्रियांक खर्गे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मणिकांत राठोड यांना अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसकडून अशा प्रकारचा दावा केला जात असल्याने या प्रकरणाला गंभीर वळण प्राप्त झाले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube