दोन्ही मुलांच्या ‘या’ निर्णयावर नारायण राणेंची नापसंती, पण…

Nitesh Rane and Nilesh Rane on Politics : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी एका मुलाखतीमध्ये माझ्या मुलांनी राजकारणात येऊ नये, त्यांनी व्यावसायात मोठं नाव करावं अशी इच्छा बोलून दाखवली होती. यावर आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांना वडिलांची इच्छा नसताना दोघेही राजकारणात कसे ओढले गेलात? असा […]

Untitled Design

Untitled Design

Nitesh Rane and Nilesh Rane on Politics : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी एका मुलाखतीमध्ये माझ्या मुलांनी राजकारणात येऊ नये, त्यांनी व्यावसायात मोठं नाव करावं अशी इच्छा बोलून दाखवली होती. यावर आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांना वडिलांची इच्छा नसताना दोघेही राजकारणात कसे ओढले गेलात? असा प्रश्न एका मुलाखतीत विचारला होता.

यावर माजी खासदार निलेश राणे म्हणाले की, मी ज्यावेळी त्यांच्यासोबत (नारायण राणे) फिरायला लागलो तेव्हा ते विरोधी पक्षनेते होते. त्यांचा दिवसरात्र संघर्ष सुरु होता. आमच्यासाठी ते प्रेरणा होते. वडिलांना मदत होईल म्हणून आम्ही राजकारणात आलो. स्व. बाळासाहेब ठाकरे यांना बघत मोठं झालो होतो. आजपण आम्ही जी काही भाषा वापरतो ती शिवसेना आमच्यातील गेली नाही म्हणून. मी आजपण तिथंच अडकलो आहे, असे निलेश राणे यांनी सांगितले.

सामना हे वर्तमानपत्र नसून ते तर शिवसेनेचं पॅम्प्लेट…मुनगंटीवारांचा खोचक टोला

आमदार नितेश राणे म्हणाले की मला राजकारणात येण्याची इच्छा नव्हती. 2006 पर्यंत मी लंडनमध्ये शिकत होतो. त्यावेळी धाडस करुन आईला सांगितले की मला लंडनमध्ये राहायचे आहे. पण त्यावेळी आर्धाच व्हिसा मिळाला म्हणून लंडनवरुन आलो. त्यावेळी साहेबांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडत गेल्या. 2009 साली निवडणूक लढवण्यासंदर्भात साहेबांनी विचारले होते पण अगोदर महाराष्ट्र समजून घेतला पाहिजे. त्यामुळे थोडं थांबलो होतो, असं नितेश राणे यांनी सांगितले.

Maharashtra Politics : झिरवळांचा मुख्यमंत्रिपदावर दावा; अजितदादांचे टेन्शन वाढले

आताचे राजकारण पूर्ण बदलून गेले आहे. कोणावर विश्वास ठेवावा हा प्रश्न आहे. भाजपमध्ये आता रुळलो आहे. 12 वर्ष काँग्रेसमध्ये होतो पण त्यांनी आम्हाला कधी स्विकारले नाही. राणे समर्थक किंवा राणे हे वेगळेचं आहेत असं म्हणत आम्हाला वेगळच ठेवलं. पण भाजपने आम्हाला परिवार म्हणून स्विकारले आहे, असं आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

Exit mobile version