Video: झिरवळांचा मुख्यमंत्रिपदावर दावा; अजितदादांचे टेन्शन वाढले

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 08T171520.983

Narahari Zirwal On CM Post :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनी राज्यातील सत्ता संघर्षावर भाष्य केले आहे. तसेच अजित पवार हे भाजपमध्ये जाणार का, यावर देखील ते बोलले आहेत. याचबरोबर आजच्या सामनाच्या अग्रलेखामध्ये पवारांनी आपला उत्तराधिकारी तयार केला नाही, असे म्हटले होते. त्यावर देखील त्यांनी भाष्य केले आहे.

एक दीड महिन्या पूर्वीपासून अजित दादा भाजपमध्ये जाणार अशा चर्चा आहे. आम्ही गेलो तर अजित पवार सुद्धा जातील पण आम्हालाच काही माहित नाही, त्यामुळे याला अर्थ नाही.  या चर्चांचा आणि शरद पवारांच्या राजीनाम्याचा काही संबंध नाही, असे ते म्हणाले आहेत.

Karnataka Assembly Election : मोदींचा अवमान करणाऱ्यांचा जनता बदला घेणार, भाजपसाठी मुख्यमंत्री शिंदे मैदानात

सामनाच्या अग्रलेखावरदेखील त्यांनी भाष्य केले आहे. केंद्रात उत्तराधिकारी आहे की नाही, अशी शंका येणं साहजिक आहे. पण सुप्रिया ताई आहेच, त्यामुळे शंका घेण्याचे काम नाही. आज ही सुप्रिया सुळेंना वेगवेगळ्या राज्यात बोलावतात. शरद पवार यांचे दातृत्व हे सगळ्या पक्षांना आहे, अशा शब्दांत त्यांनी सामनाच्या अग्रलेखाला उत्तर दिले आहे.

Sharad Pawar मोठे नेते पण… वारसदार निर्माण करण्यात अपयशी, सामनातून परखड टीका

यावेळी त्यांनी राज्याच्या सत्तासंघर्षावरदेखील भाष्य केले आहे. काही दिवसांमध्येच सत्तासंघर्षाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. यावर ते बोलले आहेत.  लोक विचारतात सत्ता संघर्षात सरकार गेल्यावर काय होईल? मी म्हणेल मलाही मुख्यमंत्री करा.  मी काय मुख्यमंत्री होऊ शकत नाही का?, असा मिश्किल प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटील, सुप्रिया सुळे व अजित पवार या तीन नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले होते. त्यानंतर एक मुलाखतीमध्ये अजितदादांनी मी आत्ताही मुख्यमंत्री पदावर दावा करु शकतो, असे म्हटले होते. त्यातच आता झिरवळ यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube