Download App

मोदींचा पवारांवर वार, ठाकरेंचा पलटवार; म्हणाले, ‘मोदी वखवखलेला, विभुक्षित आत्मा’

नरेंद्र मोदी वखवखलेला, विभुक्षित आत्मा तो सगळीकडेच जातो, या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदींवर पलटवार केला आहे.

Image Credit: letsupp

Udhav Thackeray On Pm Narendra Modi : नरेंद्र मोदी वखवखलेला, विभुक्षित आत्मा तो सगळीकडेच जातो, या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्यावर पलटवार केला आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्या नावाचा उल्लेख मात्र, टाळला आहे. मात्र, त्यांच्या बोलण्याचा रोख हा पंतप्रधान मोदींकडेच असल्याचं दिसून आलं. मोदी यांनी काल पुण्यात झालेल्या जाहीर सभेतून शरद पवार (Sharad Pawar) यांचा ‘भटकती आत्मा’ असा उल्लेख केला होता. या टीकेनंतर पुण्यातील बारामतीत आयोजित सभेतून उद्धव ठाकरे यांनी मोदींचा चांगलाच समाचार घेतला आहे. यावेळी ठाकरेंनी इतर मुद्द्यांवरुनही मोदींवर निशाणा साधला.

दक्षिण मुंबई स्वतःकडे ठेवण्यात शिंदेंना यश; यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर..

उद्धव ठाकरे म्हणाले, जशी भटकती आत्मा असते, तसाच वखवखलेला आत्माही असतो, विभुक्षित आत्माही असतो. हा वखवखलेला आत्मा सगळीकडे जातो. सगळीकडे म्हणजे पवारांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचंय, मला माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायचं अन् हे स्वत:साठी लढतात, मी माझं माझ्यासाठी अन् सगळी कामे मित्रांसाठी,
मुख्यमंत्री होणं हे जनता ठरवत असते. एका फोनवर जसं तुम्ही शाहा, त्यांच्या मुलाला बीसीसीआयचा अध्यक्ष केलं तसं नाहीये, हा वखवखलेला आत्मा राज्यात सगळीकडे फिरतोयं, वखवखलेल्या आत्म्याला संवदेना असतील तर तुमच्या नादानपणामुळे ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात त्यांच्या घरात तुटलेल्या मंगळसुत्राकडे पाहा, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मोदींचा समाचार घेतला आहे.

फडणवीससाहेब, फुंकर मारून यांचा वाडा उद्धवस्त करा; सदाभाऊ खोतांचा मोहिते पाटलांवर निशाणा

टरबुज्याला घोडा नाही हातगाडी लागते…
महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान मोदींनी काल पुण्यातील रेसकोर्समध्ये जाहीर सभा घेतली. त्यांना झोपेतही घोडेबाजारच दिसत असून कोणीतरी त्यांना सांगा की, हे घोडे वेगळे आहेत. तुम्ही घोडे म्हणून ज्यांना घेतलं ते घोडे नाही तर खेचरं, ओझं वाहणारी गाढवं आहेत. खरे घोडे हे अश्वमेधाचे असतात. टरबूजाला घोडा नाही लागत हातगाडी लागते. मला भाजप अन् मोदींची कीव येत असल्याचंही म्हणत उद्धव ठाकरेंनी सुनावलं आहे.

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?
ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत त्यांची आत्मा भटकत असते, स्वत:चं काही झालं नाहीतर दुसऱ्यांचं बिघडवण्यात त्यांना अधिक चांगलं वाटतं. महाराष्ट्रही अशा भटकती आत्माचा शिकार झालेला आहे, काही वर्षांपूर्वी इथल्या एका बड्या नेत्यांने स्वत:च्या महत्वाकांक्षेसाठी हा खेळ सुरु केला असल्याची जहरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर केली. यावेळी बोलताना मोदींनी शरद पवार यांचा नावाचा उल्लेख करणं टाळलं.

follow us

वेब स्टोरीज